शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

सेट तयार, आता प्रतीक्षा चित्रीकरणाची... कोल्हापूर चित्रनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 01:07 IST

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : न्यायालय , पाटीलवाडा, पोलीस स्टेशन, दवाखाना, आलिशान बंगला, समोर सुंदर लॉन, विविध प्रकारची फुलझाडे, हायवे, बसस्टॉप, पथदिवे, आकर्षक रंगरंगोटी अशा देखण्या रूपात कोल्हापूरची चित्रनगरी चित्रपट व्यावसायिकांसाठी सज्ज झाली आहे. मोठ्या शहरांमध्ये स्टुडिओची वानवा असताना महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील चित्रपट व्यावसायिकांना चित्रीकरणासाठी कोल्हापूर चित्रनगरी च्या रूपाने नवा ...

ठळक मुद्देसुसज्ज, देखणी लोकेशन्स; पुणे, मुंबईनंतर निर्माते, दिग्दर्शकांना नवा पर्याय उपलब्ध

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : न्यायालय, पाटीलवाडा, पोलीस स्टेशन, दवाखाना, आलिशान बंगला, समोर सुंदर लॉन, विविध प्रकारची फुलझाडे, हायवे, बसस्टॉप, पथदिवे, आकर्षक रंगरंगोटी अशा देखण्या रूपात कोल्हापूरची चित्रनगरी चित्रपट व्यावसायिकांसाठी सज्ज झाली आहे. मोठ्या शहरांमध्ये स्टुडिओची वानवा असताना महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील चित्रपट व्यावसायिकांना चित्रीकरणासाठी कोल्हापूर चित्रनगरीच्या रूपाने नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. आता या चि़त्रनगरीला प्रतीक्षा आहे, ‘लाईट... कॅमेरा... अ‍ॅक्शन’ची!

एकेकाळी चित्रपटसृष्टीची गंगोत्री असलेल्या कोल्हापुरातील चित्रपट व्यवसाय जगण्यासाठी चित्रनगरी हा एकमेव आशेचा किरण आहे. शासनाने दोन वर्षांपूर्वी ेचित्रनगरीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प सुरू केला. चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी पुढाकार घेऊन हा पहिला टप्पा पार पाडला आहे. चित्रनगरीचा मुख्य स्टुडिओ आणि पाटलाचा वाडा या दोन इमारतींत जवळपास ३० ते ३२ लोकेशन्स तयार झाली आहेत. शिवाय प्रवेशद्वार, रस्ते, लॉन, बसस्टॉप, पार्किंग, पथदिवे ही बाह्य लोकेशन्स आहेत. त्यामुळे एकेकाळी खंडर आणि भूतबंगल्याचे लोकेशन झालेल्या चित्रनगरीचे आताचे देखणे रूप पाहणे हा एक सुंदर अनुभव ठरला आहे.

इतक्या सुसज्ज रूपात तयार झालेल्या चित्रनगरीची माहिती अद्याप चित्रपट व्यावसायिकांपर्यंत पोहोचलेली नसल्याने गेल्या चार महिन्यांत दोन चित्रपटांचे पंधरा-पंधरा दिवसांचे शेड्युल वगळता येथे चित्रीकरण झालेले नाही. मुंबई-पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये स्टुडिओ मिळत नाहीत. शिवाय त्यांचे दर जास्त असतात. त्यामुळे कोल्हापूर चित्रनगरीच्या रूपाने चित्रपट निर्माते दिग्दर्शकांना स्टुडिओ आणि लोकेशन्ससाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र त्याची माहितीच अन्य शहरांतील चित्रपट व्यावसायिकांना नसल्याने अद्याप येथे चित्रीकरणाचा ओघ सुरू झालेला नाही. त्यामुळे चित्रनगरीच्या व्यवस्थापनाला केवळ विकासावर लक्ष केंद्रित न करता तिची माहिती देशातील सर्व चित्रपट व्यावसायिकांपर्यंत तसेच मालिकेच्या निर्मात्यापर्यंत कशी पोहोचविता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.दुसरा टप्पा मंजुरीच्या प्रतीक्षेतचित्रनगरी विकासाचा दुसरा टप्पा ३० कोटींचा असून, त्यात हिंदी चित्रपटांचेही चित्रीकरण करता येईल असा भव्य स्टुडिओ उभारण्यात येणार आहे. त्याचाच खर्च जवळपास २० कोटींपर्यंत आहे. या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. परिसरात १२५० झाडे लावण्यात येणार आहे. त्यासाठी काढण्यात आलेल्या निविदाही मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.शंभरजणांना रोजगारचित्रनगरीत झालेल्या दोन चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान कोल्हापुरातील जवळपास शंभर चित्रपट व्यावसायिकांना रोजगार मिळाला. चित्रपटाच्या पथकासोबत केवळ प्रमुख कलाकार आणि कॅमेरा असतो. चित्रीकरणासाठी लागणारे अन्य साहित्य कोल्हापुरातूनच पुरविले जाते. शिवाय सहकलाकार म्हणून येथील कलाकारांनाही संधी मिळते. 

चित्रनगरीची लोकेशन्स पाहायला आठवड्याला दोन-तीन चित्रपट व्यावसायिक येऊन जातात; पण चित्रनगरी चित्रीकरणासाठी सुसज्ज आहे, याची प्रसिद्धी न झाल्याने चित्रीकरणाला ओघ नाही. त्यामुळे यापुढे चित्रनगरीच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.- दिलीप भांदिगरे, प्रकल्प व्यवस्थापक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcinemaसिनेमा