शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

वारणेत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारावे

By admin | Updated: October 16, 2015 00:48 IST

देवानंद शिंदे यांचे आवाहन : विनय कोरे गौरव प्रतिष्ठानच्या शिक्षक शिक्षण भूषण पुरस्काराचे वितरण

वारणानगर : वारणेकडे एक प्रचंड इच्छाशक्ती, दृष्टी व संस्कार आहेत. गुणवत्तेच्या जोरावरच प्रगतीचे अनेक टप्पे यशस्वीपणे गाठले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशाला अभिप्रेत राहील, असे ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र’ वारणेने उभे करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे केले.येथील तात्यासाहेब कोरे पब्लिक चॅरिटेबल संचलित विनय कोरे गौरव प्रतिष्ठानच्यावतीने २०१५ गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणेम्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा समूहाचे प्रमुख विनय कोरे होते. तात्यासाहेब कोरे विद्यानगरीतील वारणा शिक्षण संकुलात हा गौरव सोहळा पार पडला.यावेळी दहा शिक्षकांना विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. गौरव प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह जी. डी. पाटील यांनी स्वागत केले. विनय कोरे म्हणाले, वारणेने शिक्षणक्षेत्रात नेहमीच बाजी मारली आहे. आज शिक्षणक्षेत्रात अनेक शिक्षक चांगले काम करतात; परंतु ते पुरस्कारांपासून वंचित राहतात. अशा वंचित गुणीजनांचा वारणेने गौरव केला आहे. यावेळी पद्मश्री तासगावकर, संभाजी लोहार, हरिश्चंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार देण्यात आला. तर जी. डी. पाटील, सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, वारणा महिला पतसंस्थेच्या संचालिका शुभलक्ष्मी कोरे, उपाध्यक्षा मंगला पाटील यांच्या हस्ते ‘गुणवंत विद्यार्थी’ पुरस्कार देण्यात आला. तसेच एमपीएससी परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. डी. के. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्राचार्या डॉ. सुरेखा शहापुरे, प्राचार्य जॉन डिसोझा, प्राचार्या हेलिना मोनीस आदी उपस्थित होते. प्रा. राजेंद्र कापरे यांनी आभार मानले. प्रा. प्रीती शिंदे व प्रा. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)पुरस्कार विजेते प्रकाश ठाणेकर (पोर्ले तर्फ ठाणे), संजय बजारे (घोटवडे), चंद्रकांत निकाडे (पोहाळे), संभाजी लोहार (माळेवाडी), सुशीला खोत (वालूर), हरिश्चंद्र पाटील (गजापूर), सुभाष गुरव (नरंदे), भीमराव माडगुंडे (किणी), प्रभावती पाटील (कुरळप), जगन्नाथ शेटे (ऐतवडे खुर्द) यांच्यासह गुणवंत विद्यार्थी तसेच एमपीएससीतील यशस्वी विद्यार्थी अशा पन्नासपेक्षा जास्त गुणीजनांना पुरस्काराने गौरविण्यात आले.