शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील यांना ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 19:18 IST

शिवाजी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते यावर्षीच्या प्रतिष्ठेच्या ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील यांना ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ पुरस्कारशिवाजी विद्यापीठाकडून गौरव; १२ जानेवारीला वितरण

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील  यांना या वर्षीच्या ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख ५१ हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे. त्याचे वितरण माजी केंद्रीय कृषिमंत्री व खासदार शरद पवार यांच्या हस्ते दि. १२ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व पुरस्कार निवड समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ज्येष्ठ विचारवंत प्रा. पाटील यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याचा, योगदानाचा सन्मान करण्यासाठी विद्यापीठातर्फे त्यांना ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

विद्यापीठ आणि शालिनी कणबरकर यांच्यातील सामंजस्य करारानुसार विद्यापीठाचे माजी कुलगुरू व प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराची निर्मिती केली आहे. भाषा, साहित्य, शास्त्र, सामाजिक व नैसर्गिक, कला, क्रीडा, समाजसेवा, सामाजिक हिताचे लक्षणीय काम करणारी व्यक्ती अथवा संस्थेच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला जातो.  ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. पाटील म्हणाले, समितीच्या अवघ्या एकाच बैठकीत एकमताने यंदाच्या पुरस्कारासाठी प्रा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकारिता, शिक्षण या क्षेत्रांत अधिकारपूर्ण आणि सहज वावर असणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना पुरस्कार देताना होणारा आनंद हा खूप मोठा आहे. या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, निवड समितीचे सदस्य प्राचार्य बी. एन. खोत, आदी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिकाविद्यापीठाच्या जडणघडणीत प्रा. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीच्या सदस्यत्वापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे अधिसभा सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता असा अनेकांगांनी झाला. विद्यापीठाने त्यांच्या योगदानाबद्दल सन २००६ मध्ये डी. लिट. देऊन त्यांचा गौरव केला असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

पहिल्यांदाच असा योगप्रा. पाटील यांना माजी केंद्रीय कृषिमंत्री पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्याचा योग पहिल्यांदाच विद्यापीठाच्या माध्यमातून आला आहे. त्यामुळे पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त होणार असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर