शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जेष्ठ कवी विलास माळी यांच्या पत्नी मृतावस्थेत आढळल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 00:01 IST

सोमवारी सकाळपासून होत्या बेपत्ता, सीमाभागात हळहळ

राम मगदूम, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर): सोमवारी सकाळी कुणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडलेल्या जेष्ठ कवी विलास माळी यांच्या पत्नी योगिता (वय ५०, रा. एस.टी. कॉलनी गडहिंग्लज) या येथील हिरण्यकेशी नदीघाटानजीकच्या श्री नंजुडेश्वर मंदिरासमोरील हिरेमठ यांच्या ऊसाच्या शेतात  मंगळवारी सायंकाळी मृतावस्थेत आढळून आल्या. त्यामुळे गडहिंग्लजसह सीमाभागात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,चन्नेकुप्पी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले कवी माळी हे येथील एस.टी. कॉलनीत कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा मुलगा आशिष हा नोकरीनिमित्त बाहेरगावी असून मुलगी क्षितीजा हिचा विवाह झाला आहे. त्यामुळे घरी सध्या पती-पत्नी दोघेच  राहत होते. गेल्या कांही वर्षांपूर्वी योगिता यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती.त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते.दरम्यान,सोमवारी (२४) सकाळी साडेसातच्या सुमारास योगिता या काही न सांगता घरातून बाहेर पडल्या होत्या. उशीरापर्यंत त्या घरी न परतल्यामुळे नातेवाइकांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. परंतु, सायंकाळपर्यंत त्यांचा शोध न लागल्यामुळे त्या बेपत्ता झाल्याची तक्रार माळी यांनी पोलिसात दिली होती.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पूर पाहण्यासाठी गेलेल्या तरूणांना नंजुडेश्वर मंदिरासमोरील ऊसाच्या शेतात एक महिला मृतावस्थेत आढळून आली.त्यांनी यासंदर्भात पोलिसांना कळविले.माळी यांनी तो मृतदेह योगिता यांचा असल्याचे सांगितले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गडहिंग्लज पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर