शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:19 IST

ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.  जाधव यांच्या निधनामुळे करवीरनगरीतील कलाक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांचे निधन ‘रंगबहार’चे नेतृत्व काळाच्या पडद्याआड

कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.  जाधव यांच्या निधनामुळे करवीरनगरीतील कलाक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.वयोमानानुसार जाधव सध्या फार बाहेर पडत नव्हते. मात्र, गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास त्यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.जाधव यांचे कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण कोल्हापुरातच झाले. त्यांनी येथेच प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन स्तरावर ३३ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. चित्रकार रा. शि. गोसावी व रवींद्र मेस्त्री यांचा सहवास त्यांना मार्गदर्शक ठरला. अनेक राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांच्या कलाकृती प्रदर्शित झाल्या.

कोल्हापूर, नागपूर येथील कलासंग्रहालयाबरोबरच नॅशनल आर्ट गॅलरी नवी दिल्ली येथे त्यांच्या कलाकृती विराजमान आहेत. वास्तववादी ते सृजनात्मक व अमूर्त शैली, टेराकोटामध्ये त्यांच्या कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेतात. रेखांकनातील त्यांचे सातत्य हे वाखाणण्याजोगे होते. अमेरिका, कॅनडा, नायजेरियासह देशातील मान्यवरांच्या संग्रही त्यांच्या कलाकृती आहेत.१८ जून १९७८ रोजी जाधव यांनी ‘रंगबहार’ या संस्थेची स्थापना केली. जयप्रभा स्टुडिओ येथे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या हस्ते आणि चित्रकार, शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांच्या प्रेरणेने हे व्यासपीठ अस्तित्वात आले. आज त्याला ४१ वर्षे झाली आहेत.

शेकडो कार्यकर्त्यांच्या सक्रियतेमुळे ही संस्था साऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात लौकिक मिळवून आहे. ‘मैफल रंगसुरांची’ या उपक्रमाद्वारे नव्या-जुन्या कलारत्नांना त्यांनी मंचावर आणले. प्रत्येक वर्षी १६ जानेवारीनंतर पहिल्या रविवारी बाबूराव पेंटर यांच्या स्मृतिदिनी टाऊन हॉलच्या हिरवळीवर ‘मैफल रंगसुरांची’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 

 

टॅग्स :artकलाkolhapurकोल्हापूर