शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नेते गुंडोपंत सूर्यवंशी यांचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:23 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कोगे बंधाऱ्यावरुन चारचाकी गाडी कोसळून बुधवारी झालेल्या अपघातात शेकापचे ज्येष्ठ नेते गुंडोपंत उर्फ गुंडाण्णा सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. ते ७३ वर्र्षांचे होते.

ठळक मुद्देकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुंडोपंत सूर्यवंशी यांचा अपघातात मृत्यू कोगे बंधाऱ्यावरुन गाडी कोसळून अपघात

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोगे बंधाऱ्यावरुन चारचाकी गाडी कोसळून बुधवारी झालेल्या अपघातात शेकापचे ज्येष्ठ नेते गुंडोपंत उर्फ गुंडाण्णा सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. ते ७३ वर्र्षांचे होते.कसबा बीड येथील गुंडोपंत सूर्यवंशी हे सकाळी कुडित्रे येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून आपल्या अल्टो या चारचाकीतून ते गावी परतत असताना कोगे-कुडित्रे मार्गावरील अरुंद असलेल्या कोगे बंधाऱ्यावरुन १२. ४५ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी भोगावती नदीत कोसळली. हा अपघात झाल्याचे समजताच बंधाºयावर प्रचंड गर्दी झाली होती.

स्थानिक लोकांच्या प्रयत्नांमुळे सुमारे सव्वा एकच्या सुमारास त्यांची गाडी बाहेर काढण्यात आली. गाडीत गुंडाण्णा जखमी अवस्थेत होते. त्यांना तत्काळ कोल्हापूरात सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली आहे.गुंडोपंत सूर्यवंशी हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. उभी हयात त्यांनी पक्षाचे काम केले. शेकापचे नेते माजी आमदार संपतबापू पवार यांच्याबरोबरीने त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मुलांनी अलिकडेच काँग्रेसचे काम सुरु केले आहे. 

करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी आणि जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष श्यामराव सूर्यवंशी यांचे ते वडील होत.

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर