शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील-भुयेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 18:25 IST

Congress Kolhapur : शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संस्थापक सदस्य, शाहू शिक्षण संस्थेचे संचालक ज्येष्ठ कॉग्रेस नेते बाबासाहेब ज्ञानदेव पाटील (भुये, ता. करवीर) (वय ७८) यांचे शनिवारी दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

ठळक मुद्देकॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील-भुयेकर यांचे निधनस्पष्टवक्तेपणा आणि सर्व समावेशक नेतृत्व म्हणून ओळख

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संस्थापक सदस्य, शाहू शिक्षण संस्थेचे संचालक ज्येष्ठ कॉग्रेस नेते बाबासाहेब ज्ञानदेव पाटील (भुये, ता. करवीर) (वय ७८) यांचे शनिवारी दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.रुबाबदार मिश्या, स्पष्टवक्तेपणा आणि सर्व समावेशक नेतृत्व म्हणून बाबासाहेब पाटील यांची जिल्ह्यात ओळख होती. कॉग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांनी करवीरमध्ये राजकीय सुरुवात केली. १९७७ मध्ये त्यांनी शेकापमधून करवीर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर पुन्हा ते कॉग्रेसमध्ये सक्रीय झाले, दिवंगत नेते श्रीपतराव बोंद्रेदादा यांचे ते निष्ठावंत सहकारी होते.

बोंद्रेदादा नंतर आमदार पी. एन. पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ते सक्रीय राहिले. भुये गावातील विविध संस्थांच्या उभारणीत त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी तब्बल तेरा वर्षे करवीरचे सभापती तर दहा वर्षे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले.त्यांच्यावर गेल्या तीन महिन्यापासून कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसापुर्वीच त्यांना घरी आणण्यात आले होते. शनिवारी दुपारी साडे बारा वाजता ताराबाई पार्क येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. कसबा बावडा येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका शंकुतला पाटील, सूपूत्र राजीवजी सूतगिरणीचे संचालक भारत, उत्तम, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी साडे आठ वाजता आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर