शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना सत्तेसाठी लाचार : जोगेंद्र कवाडे यांची कोल्हापूरात टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 16:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चौकीदार चोर’ म्हणून हिणवणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वताच चोरांच्या टोळीत सहभागी झाले. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देशिवसेना सत्तेसाठी लाचार : जोगेंद्र कवाडे यांची कोल्हापूरात टीका परिवर्तनात आंबेडकरी जनतेचा मोठा सहभाग

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चौकीदार चोर’ म्हणून हिणवणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वताच चोरांच्या टोळीत सहभागी झाले. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी देशात निश्चित परिवर्तन करेल, यामध्ये आंबेडकरी जनतेचा मोठा सहभाग असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.प्रा. कवाडे पक्षाच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रा. कवाडे म्हणाले, सरकारमध्ये रहायचे आणि सरकारलाच शिव्या घालण्याचा उद्योग शिवसेनेने केला. काल-परवा पर्यंत स्वबळाचा नारा देत मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहे, म्हणणारे ठाकरे चोरांच्या टोळीत सामील झाले कसे? याचे उत्तर महाराष्ट्राच्या  जनतेला द्यावे लागेल.

समाजातील प्रत्येक घटक सरकारच्या कारभाराने त्रस्त आहे. यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर होते, तेथून १२ किलो मीटर शहीद जवानाचे कुटूंब रहात होते. तिथे जाऊन कुटूंबाचे सात्वन करावे, असे त्यांना वाटले नाही. यावरून भाजप सरकार संवेदीनहीन आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत केंद्र सरकारच्या आडून देशात आपला अजेंडा राबवत आहेत. देशाची वाटचाल अराजकतकडे सुरू असून कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी परिवर्तन करून देश वाचवेल, असेही त्यांनी सांगितले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर, नंदकुमार गोंधळी आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेkolhapurकोल्हापूर