शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

हागणदारीमुक्त शहरची स्वयंघोषणा अनुदानासाठी!

By admin | Updated: February 15, 2017 00:41 IST

इचलकरंजी नगरपालिका : प्रांत कार्यालयाभोवतीच हागणदारीचे साम्राज्य

इचलकरंजी : येथील नगरपालिकेने उद्या, गुरुवारी बोलविलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये इचलकरंजी शहर हे हागणदारीमुक्त झाल्याची स्वयंघोषणा करण्याबाबत ठराव करणे व केलेला ठराव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठविणे, असा विषय अजेंड्यावर घेतला आहे. या विषयास मंजुरी दिल्यास नगरपालिकेला सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. मात्र, शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त न होताच हा विषय घेतल्याचे समजताच सोशल मीडियासह नागरिकांतून याबाबत नगरपालिकेच्या कारभाराची खिल्ली उडवली जात आहे.नगरपालिकेच्या आकडेवारीनुसार केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून दोन कोटी ८५ लाखांचे अनुदान २४७६ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यातून आतापर्यंत १६०० लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. मात्र, उर्वरित तब्बल ८७६ कुटुंबीयांनी अद्याप शौचालये बांधली नाहीत, हे स्पष्ट होते. तसेच शहरातील दोन तालुक्यांचे प्रमुख ठिकाण असलेल्या प्रांत कार्यालय भोवतालच्या परिसरात राजरोसपणे उघड्यावर शौचास बसत आहेत. यासह शहरातील टाकवडे वेस रोड, निरामय दवाखाना परिसर, कलानगर तीन बत्ती परिसर अशा अनेक प्रमुख भागांत सर्रास उघड्यावर शौचास बसण्याचे सुरूच आहे. त्यामुळे अनुदानाच्या हव्यासापोटी शंभर टक्के हागणदारीमुक्त शहर न करताच ठराव कसा काय केला जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिलेल्या भेटीवेळीही शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेबाबत, तसेच शहरातील अस्वच्छतेबाबत नगरपालिका प्रशासनाला चांगलेच खडसावले होते. नगरपालिकेने शहर, लोकसंख्या व राहणीमान या आधारावर आवश्यक टक्केवारी पार झाल्याचा तांत्रिक मुद्दा पुढे करून अनुदान मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कागदोपत्री पूर्ततेनंतर यश मिळेलही. मात्र, साक्षात शंभर टक्के हागणदारीमुक्त शहर होणार कधी, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)मुख्याधिकाऱ्यांची डोळे झाकून सहीउद्या, गुरुवारी या सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयांच्या शेवटी नेहमीप्रमाणे शेवटचा विषय ऐनवेळच्या विषयांचा आहे. त्यामध्ये ऐनवेळेच्या विषयांमध्ये पाचपेक्षा जादा विषय, तसेच आर्थिक व धोरणात्मक निर्णय होण्यास हरकत नाही, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, नियमानुसार त्याठिकाणी मान्य करता येणार नाहीत, असे नमूद करणे आवश्यक होते. हे न पाहताच मुख्याधिकाऱ्यांनी डोळे झाकून सही केली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.