शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

एकगम्यानंद स्वामीजींची निडसोशी मठाच्या नव्या उत्तराधिकारीपदी निवड; रूद्राक्ष, लिंग प्रदान कार्यक्रम उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 12:37 IST

किल्ले सामानगडच्या गुरव बंधूंनी निडसोशी मठाची स्थापना केली

संकेश्वर : निडसोशी (ता. हुक्केरी) येथील श्री दुरदुंडेश्वर मठाचे  उत्तराधिकारी म्हणून रामकृष्ण मिशन मठाचे श्री एकगम्यानंद स्वामीजी यांची निवड केली आहे. यापुढे ते मठाचे दहावे उत्तराधिकारी ( ६ वे निजलिंगेश्वर स्वामीजी) या नावाने ओळखले जातील, अशी घोषणा विद्यमान मठाधिपती श्री पंचम् शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी गुरूवारी(२ मार्च) केली.निडसोशी मठात आयोजित रूद्राक्ष व लिंग प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. गुरुसिद्धेश्वर स्वामीजी (बेळगाव), त्रिनेत्र स्वामीजी (मंड्या), अल्लमप्रभू स्वामीजी (चिंचणी), चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी (हुक्केरी), गुरुसिद्धेश्वर स्वामीजी (हत्तरगी) संपादना स्वामीजी (चिकोडी) यांची दिव्य सानिध्यात एकगम्यानंद स्वामीजींना लिंग व रूद्राक्ष प्रदान करण्यात आले.शिवलिंगेश्वर महास्वामीजी म्हणाले,निडसोशीचे आद्य निजलिंगेश्वर महास्वामीजी यांनी मठाची स्थापना केली. किल्ले सामानगडाच्या पायथ्याशी असलेल्या चिंचेवाडीतील गुरव घराण्यातील आद्य शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी हा मठ बांधला आहे. या मठाची ‘गुरु-शिष्य’ परंपरा फार मोठी आहे.  त्यामुळे सर्व भक्त मंडळींचा अभिप्राय घेवून कायद्याच्या चौकटीतच मठाचे उत्तराधिकारी म्हणून श्री एकगम्यानंद यांची निवड केली आहे. या मठाची वैभवशाली परंपरा ते नक्कीच समर्थपणे पुढे चालवतील.एकगम्यानंद स्वामीजी म्हणाले, निडसोशी मठात शिक्षण घेताना अध्यात्मिक क्षेत्राची गोडी लागली. त्यामुळे बेळगावच्या रामकृष्ण मिशनमध्ये सहभाग झालो. धारवाड, मंगळूर येथे २० वर्षे सेवा केली. रामकृष्ण मठातर्फे मंगळूरमध्ये राबविलेल्या स्वच्छता अभियानाची दखल देशपातळीवर घेण्यात आली. श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवक म्हणून मठाची उज्वल परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करेन.  यावेळी ‘केएलई’चे अध्यक्ष प्रभाकर कोरे, खासदार आण्णासाहेब ज्वोले, आमदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांचीही भाषणे झाली.कार्यक्रमास संकेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती, निपाणीच्या हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, हिडकलच्या संगम साखर कारखान्याचे राजेंद्र पाटील,माजी मंत्री ए. बी. पाटील, प्रकाश कणगली, अरविंद कित्तूरकर,नागाप्पा कोल्हापूरे, बाळासाहेब गुरव,रमेश रिंगणे,शंकर हेगडे, राजेंद्र गड्यान्नावर,सुनिल पर्वतराव, आप्पासाहेब शिरकोळी, सोमगोंडा आरबोळे आदींसह बेळगांव व कोल्हापूर जिल्ह्यातील भक्त उपस्थित होते. प्रा.गुरुपाद मरिगुद्दी यांनी प्रास्ताविक केले. संतोष पाटील यांनी आभार मानले.एकगम्यानंदजी मूळचे ‘निडसोशी’चेच !अवघ्या चाळीशीतील नवे उत्तराधिकारी एकगम्यानंद स्वामीजी हे निडसोशीचेच असून त्यांचे मूळ नाव मलगौडा पाटील आहे.  त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निडसोशी मठाच्या शाळेतच झाले. कोलकात्ता विद्यापीठातून त्यांनी संस्कृतची पदवी संपादीत केली आहे. गेल्या २० वर्षापासून ते रामकृष्ण मिशन आश्रमाच्या सेवेत आहेत.दिवंगत आद्य निजलिंगेश्वर यांच्यानंतर दुसरा उत्तराधिकारी देण्याचा मान निडसोशीकरांना मिळाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर