शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

निवडक सहा गावांचा आठवड्यात कोल्हापूर हद्दवाढीत समावेश - पालकमंत्री हसन मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 12:43 IST

तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी ‘डीपीडीसी’मधून निधी देणार

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये पहिल्या टप्प्यात निवडक सहा गावांचा समावेश करण्यात येणार असून येत्या आठ दिवसात त्याबाबत निर्णय होईल. उर्वरित गावांबाबत लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार नाही, आपण तरी त्यामध्ये भाग घेणार नसल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोल्हापूर शहरातील ८० किलोमीटरच्या रस्त्याचा प्रश्न असून त्यासाठी महापालिकेने मूलभूत योजनेतून निधी मिळण्याबाबत ९० कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे, त्याला लवकरच मंजुरी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.कोल्हापूर शहरातील विविध कामांचा आढावा शुक्रवारी मंत्री मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहात घेतला, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अपर आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त केशव जाधव, शिल्पा दरेकर, साधना पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते.हद्दवाढीत जाऊ शकणारी गावे..

कळंबा, आर. के. नगर, पाचगाव, मोरेवाडी, उचगाव, बालिंगा

१० जानेवारीपर्यंत पूर्ण दाबाने पाणीपाणी थेट पाइपलाइनचे दोन पंप सुरू झाले आहेत, तिसरा पंप १० जानेवारीपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. चंबुखडी पाइपलाइनसाठी क्रॉस कनेक्शन पूर्ण होईल. ‘आयआयटी’ मुंबई यांच्यावतीने बाराईमाम, लक्षतीर्थ, ब्रम्हपुरी या भागात तांत्रिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्राथमिक निरीक्षणानुसार मुख्य जलवाहिनी, चंबुखडी येथे व्हॉल्व्ह बदलण्याची सूचना केली आहे, त्यासाठी एक कोटी खर्च अपेक्षित असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी ‘डीपीडीसी’मधून निधी देणारअंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी ६९ पैकी १० कोटी प्राप्त झाले असून ४० कोटी पुरवणी यादीत मंजूर झाले आहेत. यामध्ये तीन मजली पार्किंग, भक्तनिवास होणार आहे. मंदिर परिसर निधीसाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची पुढील आठवड्यात भेट घेणार आहे. तीर्थक्षेत्र आराखड्याच्या पूर्ततेसाठी जिल्हा नियोजनामधून निधी देणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात शहरातील विविध योजना :

  • अमृत पाणीपुरवठा योजना :
  • योजना : ११६.७१ कोटी
  • पूर्तता : १२ उंच टाक्यापैकी ३ पूर्ण, ३९६ किलो मीटर पैकी २९१ किलो मीटरची पाइपलाइन पूर्ण
  • पूर्ण कधी होणार : ३१ मार्च २०२४
  • ड्रेनेज योजना :
  • योजना : ७०.७७ कोटी

प्रस्तावित कामे :

  • दुधाळी झोनमध्ये ७८ किलोमीटर पैकी ६८ किलोमीटरचे काम पूर्ण.
  • ४ एमआयडी एसटीपी कसबा बावडा काम पूर्ण
  • ६ एमआयडी एसटीपी दुधाळी ६० टक्के काम पूर्ण
  • मोठे नाले आडवले, छोट्या आठ पैकी दोन नाल्यांचे काम ‘अमृत’मधून पूर्ण
  • अमृत भाग-२ योजना (प्रस्तावित) :
  • योजना रक्कम : ३४८ कोटी
  • शहराच्या उर्वरित विस्तारित भागात ड्रेनेज लाईन टाकणे, पंपिंग स्टेशन बांधणे, एसटीपी बांधणे.

शाहू मिलच्या जागेबाबत लवकरच चर्चाशाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक प्रलंबित आहे. ही जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळची असून त्याची किंमत ४१० कोटी रुपये आहे. राज्याचे वस्त्रोद्येाग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ