शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

प्लॅस्टिक बाटल्यांच्या खाली लपविलेला विदेशी मद्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:26 IST

कोल्हापूर : फोंडा ते राधानगरी मार्गावर न्यु करंजे येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारा हौदा पिकअप जीप राज्य उत्पादन शुल्क ...

ठळक मुद्देप्लॅस्टिक बाटल्यांच्या खाली लपविलेला विदेशी मद्याचा साठा जप्तसुमारे ७ लाख ६१ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : फोंडा ते राधानगरी मार्गावर न्यु करंजे येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारा हौदा पिकअप जीप राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी पहाटे पकडली.

यावेळी पाच लाखाचा विदेशी मद्यसाठा प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांच्या ढिगाऱ्याखाली मिळून आला. मद्यासह वाहन असा सुमारे ७ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित राजन नारायण नाईक (वय ४०, रा. सावंतवाडी, खासकीलवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), शिवराम विश्वनाथ हळदणकर (३०, रा. चराटा, शिल्पग्राम, सावंतवाडी) यांना अटक केली. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.भरारी पथकास फोंडा ते राधानगरी मार्गावरुन काही लोक बेकायदा गोवा बनावट मद्याची वाहतुक करणार असलेची माहिती मिळाली. त्यानुसार या मार्गावर ठिकठिकाणी पथके तैनात करुन पाळत ठेवली. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास न्यु करंजे (ता. राधानगरी) गावच्या हद्दीत पिकअप वाहन येत असल्याचे दिसले. त्याला थांबूवन चालक राजन नाईक याचेकडे चौकशी केली असता रिकाम्या प्लॅस्टीक बाटल्या भरलेल्या गोण्या असल्याचे सांगितले.

गोपनिय माहितीनुसार वाहन हेच असलेची खात्री झाल्याने तपासणी केली असता बाटल्यांच्या गोण्याखाली लपविलेले मद्याचे बॉक्स मिळून आला. मद्यसाठा कोणाला देणार होते. कोठून खरेदी केला, याबाबत चौकशी सुरु असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. ही कारवाई निरीक्षक संभाजी बरगे, जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर श्ािंदे, सचिन काळे, जय शिनगारे, रंजना पिसे यांनी केली. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूर