शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

संकेश्वर पालिकेच्या नगराध्यक्षपदी सीमा हतनुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:42 IST

Muncipal Corporation, Karnatak, belgaon , kolhapur संकेश्वर नगरपालिकेच्या दहाव्या नूतन नगराध्यक्षपदी सीमा श्रीकांत हतनुरे यांची तर उपाध्यक्षपदी अजित अशोक करजगी निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी अशोक गुरानी यांनी केली. पालिकेच्या अपक्षाच्या मदारीवर भाजपाचा झेंडा फडकविला आहे.

ठळक मुद्देसंकेश्वर पालिकेच्या नगराध्यक्षपदी सीमा हतनुरे उपनगराध्यक्षपदी अजित करजगी यांची निवड

संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेच्या दहाव्या नूतन नगराध्यक्षपदी सीमा श्रीकांत हतनुरे यांची तर उपाध्यक्षपदी अजित अशोक करजगी निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी अशोक गुरानी यांनी केली. पालिकेच्या अपक्षाच्या मदारीवर भाजपाचा झेंडा फडकविला आहे.नगराध्यक्षपदासाठी हतनुरे (भाजप) व शेवंता कब्बुरी (काँगे्रस) तर उपनगराध्यक्षपदी अजित करजगी (अपक्ष) व डॉ. जयप्रकाश करजगी (काँग्रेस)तर्फे अर्ज दाखल केले.पालिकेत ११ काँगे्रस, ११ भाजप, १ अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. दरम्यान भाजप उमेदवाराला १४ मते मिळाली तर काँगे्रसला ११ मते मिळाली. यामध्ये विशेषत: आमदार/ खासदारांचे मते ग्राह्य धरत असल्याने ती मते भाजपच्या पारड्यात पडली.कर्नाटकात २ सप्टेंबर २०१८ ला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्याने पण अध्यक्ष, उपाध्यक्ष पदास राज्यात आरक्षण न्याय प्रविष्ठ बनल्याने लोकप्रतिनिधीव्यतिरिक्त २५ महिने सभागृह रिकामे असल्याने प्रशासकीय कामकाज सुरू होते. अखेर या निवडणुकीने तो खुला झाला.काँगे्रसतर्फे व्हीप लागू केल्याने त्याची ११ मते फुटली नाहीत. निवडणुकीत उपनगराध्यक्षपदासाठी पुतण्या अजित करजगी (अपक्ष) यांनी आपले काका डॉ. जयप्रकाश करजगी (काँगे्रस) यांचा पराभव केला. निवडीनंतर नगराध्यक्षा हतनुरे म्हणाल्या, नागरी समस्या सोडविण्यासाठी मूलभूत सवलती नागरिकांना देण्याचा मानस आहे. आमदार उमेश कत्ती यांच्या सहकार्याने सर्व नगरसेवकांना विश्वासात घेवून स्वच्छ व सुंदर संकेश्वर बनविणार आहे.निवडणूक निकाल घोषित होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. नगराध्यक्षा हतनुरे यांचे माहेर कोल्हापूर असून त्या व्ही. व्ही. गाडगीळ यांच्या कन्या आहेत. उपनगराध्यक्ष करजगी हे माजी नगरसेवक अशोक करजगी यांचे सुपूत्र आहेत. यावेळी खासदार आण्णासाहेब ज्वोले व आमदार उमेश कत्ती यांच्यासह समर्थक उपस्थित होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर