शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर, पन्हाळागड पाहून ‘एनएसएस’चे शिबिरार्थी भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 14:55 IST

करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर, पन्हाळगड, रंकाळा तलाव पाहून  देशभरातून आलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) शिबिरार्थी भारावून गेले. शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिर सुरू आहे.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिर, पन्हाळागड पाहून ‘एनएसएस’चे शिबिरार्थी भारावलेशिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय एकात्मता शिबिर

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर, पन्हाळगड, रंकाळा तलाव पाहून  देशभरातून आलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) शिबिरार्थी भारावून गेले. शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिर सुरू आहे.या राष्ट्रीय शिबिराचा शनिवार (दि. १५) पासून प्रारंभ झाला. त्यासहभागी शिबिरार्थींनी पन्हाळगडाला भेट दिली. तेथील तीन दरवाजा, पुसाटी बुरूज, धान्य कोठार, तबक उद्यान पाहून ते भारावले. विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राला त्यांनी भेट देऊन, तेथील कामकाजाची माहिती घेतली. यानंतर दुपारी अंबाबाई मंदिर, भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सायंकाळी रंकाळा तलाव गाठला. ही मंदिरे आणि तलाव परिसर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रबद्ध केला.

काहीजणांनी मंदिर आणि तलावाची माहिती जाणून घेतली. रात्री या शिबिरार्थींना विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापनावरील लघुपट दाखविण्यात आला.

यावेळी ‘एनएसएस’चे डी. कार्तिकेयन, डी. के. गायकवाड, अजय शिंदे, डी. नायक, आदी उपस्थित होते. या शिबिरात युवा नेतृत्व, लघुपट निर्मिती या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

 

गेल्या दोन वर्षांपासून एनएसएसच्या शिबिरात मी सहभागी होत आहे. त्यातून देशातील विविध राज्यांतील विद्यार्थी सहभागी होत असल्याने आम्हाला एकमेकांची संस्कृती समजून घेता येत आहे.- अल्मास खान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

 

या शिबिरात सहभागी होण्याचे माझे यंदाचे तिसरे वर्ष आहे. युवा पिढीमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण करण्यासाठी एनएसएसचे शिबिर उपयुक्त ठरत आहे. या शिबिरात क्रीडा स्पर्धांचा समावेश करावा.- अंजली दीक्षित, एस. एस. जैन सुबोध पी. जी. कॉलेज, राजस्थान

 

देशात ४० लाख, तर महाराष्ट्रात ३ लाख ३० हजार इतके एनएसएसचे स्वयंसेवक आहेत. त्यांच्या श्रमदानातून वर्षाला अनेक कामे होतात. विद्यार्थ्यांमधील ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हावा. त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक भावना रूजविण्यासाठी राष्ट्रीय शिबिर घेण्यात येत आहे.- अजय शिंदे, युवा सहयोगी, एनएसएस.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर