शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींना हरवलं अन् तिथेच आवाडेंचं ठरलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 18:02 IST

लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढायचे कुणी हे ठरत नव्हते.

ठळक मुद्देधैर्यशील यांच्या विजयात आवाडे यांच्या बंडाची बीजेराहुल आवाडेंचा दबाव : लोकसभेपासूनच सुरू होत्या हालचाली

विश्र्वास पाटील कोल्हापूर : प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी त्यामागे जिल्हा परिषद सदस्य असलेला त्यांचा मुलगा राहुल यांचाच दबाव जास्त होता. त्यातूनच हा निर्णय झाल्याचे पुढे आले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून धैर्यशील माने हे विजयी झाल्यापासूनच आवाडे गटात जास्त अस्वस्थता होती. त्याचीच परिणती पक्ष सोडण्यात झाली आहे. आवाडे गटाच्या राजकारणात राहुल यांचा शब्द आता कोण डावलू शकत नाही, हेच त्यामागील खरे कारण आहे.लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढायचे कुणी हे ठरत नव्हते. त्यावेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापासून धैर्यशील माने, निवेदिता माने, आदी विविध नावांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी राहुल आवाडे यांचा शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न होता.

मी शिवसेनेत जाऊन शेट्टी यांच्याविरोधात लढतो, असा त्यांचा कुटुंबातही टोकाचा आग्रह होता. त्यांनी शेट्टी यांच्याविरोधात त्यावेळी अर्जही दाखल केला होता. त्यावेळी त्यांचा अर्ज माघार घेताना आवाडे कुटुंबीयांना नाकीनऊ आले होते; परंतु त्याच्या काही दिवसच आधी प्रकाश आवाडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली होती आणि आवाडे घराण्याचे काँग्रेसशी इतक्या वर्षांचे संबंध आहेत. शिवाय त्यांचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून शेट्टी यांच्याशीही चांगले संबंध तयार झाले होते. त्यामुळे कुटुंबातूनच राहुल यांना पाठबळ मिळाले नाही.

पुढच्या राजकारणात धैर्यशील माने यांना ही संधी मिळाली व ते लाटेवर स्वार होऊन खासदार बनले. त्यानंतर मात्र राहुल यांची चिडचिड जास्त वाढली. ‘तुमच्यामुळेच माझा खासदारकीचा हातातोंडाचा घास गेला,’ असे राहुल यांचे म्हणणे होते. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांचा वडिलांवर काँग्रेस सोडण्याचा दबाव होता. तो लोकसभेला नाही, परंतु किमान विधानसभेच्या अगोदर तरी यशस्वी झाला.आवाडे नकोत की हात?राहुल यांनीच गेल्या महिन्यात इचलकरंजीत तीन टीम नेमून घरोघरी सर्वेक्षण करून घेतले होते. त्यामध्ये ‘आम्हांला आवाडे हवेत; परंतु तुमचे हात चिन्ह नको अशी बहुतांश लोकांनी सांगितल्याचे आवाडे यांचे म्हणणे होते.

नव्या पिढीला हात चिन्हावर मते द्यायला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही हे चिन्ह घेऊ नका, असा निर्णय झाला. चिन्ह घ्यायचे नाही तर पक्षात राहून अपक्ष म्हणून लढता येणार नाही म्हणून त्यांनी शेवटी काँग्रेसलाच सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. इचलकरंजीला आवाडे नकोत की हात नको याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे. 

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर