शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

चांगला सिनेमा पहा, सामाजिक जाणीवा जोपासा : कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:42 IST

यावेळी पाहुण्यांच्या हस्ते जगभरातील १० उत्कृष्ट बालचित्रपटांचे गोष्टीरूप कथानक असलेल्या ह्यशिनेमा पोरांचाह्ण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले.

ठळक मुद्देचिल्लर पार्टीच्या पाचव्या बालचित्रपट महोत्सवास प्रारंभअभिनेता आनंद काळे यांनी केले कौतुक

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी चांगले सिनेमे पाहिले पाहिजेत, धाडस, चांगली वृत्ती आणि सामाजिक जाणीवा जोपासल्या पाहिजेत. चिल्लर पार्टीच्या या उपक्रमातून सामाजिक जाणीवा निर्माण होतील, अशी अपेक्षा कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली.येथील शाहू स्मारक भवनात चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत आयोजित पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी कलशेट्टी बोलत होते. दोन दिवसाच्या बालचित्रपट महोत्सवास मंगळवारी प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता आनंद काळे आणि शिक्षण समितीचे सदस्य नगरसेवक रत्नेश शिरोळकर उपस्थित होते.प्रारंभी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी महोत्सवासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसोबत कागदी विमान उडवून या महोत्सवाचे अनोख्या पध्दतीने उदघाटन केले.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते जगभरातील १० उत्कृष्ट बालचित्रपटांचे गोष्टीरूप कथानक असलेल्या ह्यशिनेमा पोरांचाह्ण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले.आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले, की कचरा न करता केलेल्या या पर्यावरणपूरक समारंभाबद्दल चिल्लर पार्टीच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले पाहिजे. कोल्हापूर शहर स्वच्छ आणि प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी विध्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

अभिनेता आनंद काळे यांनी जगभरातील उत्तम सिनेमे पाहण्याची संधी या महोत्सवात मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि चिल्लर पार्टीच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.प्रारंभी रविंद्र शिंदे यांनी प्रास्तविक केले. यावेळी अरशद महालकरी, अनुजा बकरे आणि नसीम यादव या ह्यशिनेमा पोरांचाह्ण या पुस्तकाच्या बाललेखकांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी यावेळी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई, निहाल शिपुरकर, शैलेश चव्हाण, श्रीधर कुलकर्णी, अनिल कोकणे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. आभार अभय बकरे यांनी मानले. यावेळी करवीरचे गट शिक्षनाधिकरी विश्वास सुतार, मिलिंद नाईक, सुधाकर सावंत, मिलिंद कोपार्डेकर, पद्मश्री दवे, शिवप्रभा लाड, अनिल काजवे,गुलाबराव देशमुख, चंद्रशेखर तुदिगाल, ओंकार कांबळे आदी उपस्थित होते.

  • महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

 

  • महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महापालिकेच्या ३० शाळांतील सुमारे १६०० विद्यार्थी सहभागी झाले. दिवसभरात बेब, फ्री विली आणि पीटस ड्रॅगन हे सिनेमे दाखविण्यात आले.

 

  • महोत्सवात आज

या महोत्सवात  डम्बो आणि २ वाजता डॉग्ज वे होम हे सिनेमे हे सिनेमे दाखविण्यात येणार आहेत. दुपारी महोत्सवाची सांगता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव उपस्थित  आहेत.शाहू स्मारक भवनाच्या आवारातील विमान लक्षवेधीया महोत्सवाचा लोगो असलेल्या विमानाची प्रतिकृती शाहू स्मारक भवनाच्या प्रवेशद्वारात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. याशिवाय महानगरपालिकेतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या कागदी विमानांच्या कलाकृतींचे प्रदर्शन प्रांगणात भरविण्यात आले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी