शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या टप्प्यात १९ कोव्हीड काळजी केंद्रात २३३८ खाटांची होणार सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 20:31 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना म्हणून दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड काळजी केंद्रासाठी १९ संस्थांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्यात १९ कोव्हीड काळजी केंद्रात २३३८ खाटांची होणार सोयप्रभावी कामकाजासाठी तीन नोडल अधिकारी नियुक्त-जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

कोल्हापूर- दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात १९ ठिकाणी कोव्हीड काळजी केंद्रातून २३३८ खाटांची सोय करण्यात येणार आहे. या केंद्रांचे कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रासाठी आरोग्य आधिकारी डॉ. दिलीप पाटील, नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पीपाटील आणि ग्रामीण भागासाठी आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आज आदेश दिले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना म्हणून दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड काळजी केंद्रासाठी पुढील संस्थांची निवड करण्यात आली आहे.नव्याने स्थापन होणारी कोव्हीड काळजी केंद्रे आणि खाटांची क्षमताकरवीर व कोल्हापूर शहर -

  • शिवाजी विद्यापीठ होस्टेल क्र १ आणि २ प्रत्येकी १५० खाट,
  • शिवाजी विद्यापीठ होस्टेल क्र ३ - २०० खाट,
  • तंत्रशास्त्र विभाग- ३०० खाट,
  • आयसोलेशन रुग्णालय व आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र,
  • अंडी उबवणी केंद्र,
  • कृषी महाविद्यालय होस्टेल (पदवी आणि पदव्युत्तर),
  • राजर्षी शाहू पब्लिक स्कूल,
  • कुरुकली प्रत्येकी १०० खाट. 
  • कागल- कोगनोळी टोल नाका, कोव्हीड काळजी केंद्र गोदाम- १५० खाट
  • भुदरगड- संत बाळूमामा मंदिर रुग्णालय- १५० खाट
  • शिरोळ- डॉ. जे जे मगदूम वैद्यकीय महाविद्यालय, आगर- ६०, डॉ. एम सी मोदी होमिओपॅथी रुग्णालय, जयसिंगपूर- ९०.
  • हातकणंगले- संजय घोडावत होस्टेल, अतिग्रे, एच ५, एच ६ आणि एच ७ अनुक्रमे ९०, १०५ आणि १०० खाट,
  • पन्हाळा- संजीवन महाविद्यालय- १२८, महात्मा गांधी रुग्णालय, वारणा- १५० आणि डॉ. पाटील आयुर्वेदीक रुग्णालय, कोडोली- ७५.
  • शाहुवाडी- प्राथमिक आरोग्य केंद्र शित्तूर- ४०

या संस्थांची दुसऱ्या टप्प्यात कोव्हीड काळजी केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. या केंद्राचे कामकाज तातडीने सुरु करण्याविषयी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रातील कामकाजासाठी तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर