शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग करा : जिल्हाधिकारी देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:33 IST

बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींचे स्क्रीनिंग झाले पाहिजे. त्यातून कोणीही सुटणार नाही याची दक्षता घ्या. ६० वर्षांपुढील तसेच व्याधिग्रस्त व्यक्तींची स्रावतपासणी झाली पाहिजे. त्याचबरोबर गावामध्ये कोविड काळजी केंद्र आणि संस्थात्मक अलगीकरण यांसाठी हॉटेल, रिसॉर्ट यांच्याशी चर्चा करून पर्यायी नियोजन सज्ज ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

ठळक मुद्देबाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग करा : जिल्हाधिकारी देसाईअलगीकरण केंद्रात सुविधा सज्ज ठेवा

कोल्हापूर : बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींचे स्क्रीनिंग झाले पाहिजे. त्यातून कोणीही सुटणार नाही याची दक्षता घ्या. ६० वर्षांपुढील तसेच व्याधिग्रस्त व्यक्तींची स्रावतपासणी झाली पाहिजे. त्याचबरोबर गावामध्ये कोविड काळजी केंद्र आणि संस्थात्मक अलगीकरण यांसाठी हॉटेल, रिसॉर्ट यांच्याशी चर्चा करून पर्यायी नियोजन सज्ज ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी यांच्याशी जिल्हाधिकारी देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.जिल्हाधिकारी म्हणाले, बाहेरील जिल्ह्यांतून तपासणी नाक्यावरून येणाऱ्या व्यक्ती त्यांना दिलेल्या रुग्णालयांत तपासणीसाठी जातात का, याची तपासणी करायला हवी. यातून एकही व्यक्ती सुटता कामा नये. पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट सहवासितांची माहिती प्रभावीपणे दक्ष राहून गोळा करा.

कोविड काळजी केंद्र तसेच संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ऑक्सिजन सिलिंडर, एन-९५ मास्क, पल्स ऑक्सिमीटर यांबाबत सुविधा सज्ज ठेवा. त्याचबरोबर हॉटेल, रिसॉर्ट यांच्याशी चर्चा करून पेड आयक्यूबाबत नियोजन करा. प्रत्येक कोविड काळजी केंद्रासाठी १५ ऑक्सिजन सिलिंडर ठेवावेत. त्याचबरोबर जिल्हा कोविड आरोग्य केंद्रात एकूण खाटांच्या ५० टक्के ऑक्सिजन सिलिंडरची सोय असली पाहिजे. कोविड काळजी केंद्रात आलेल्या प्रत्येकाला आरोग्य सेतू ॲप इन्स्टॉल करायला सांगा. त्याचबरोबर संगणक प्रणालीमध्ये रोजच्या रोज माहिती भरा, ती तपासा आणि तिचा स्क्रीनिंगसाठी पाठपुरावा करा.

महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.करवीर, कागलचे काम चांगलेमहाआयुष सर्व्हेक्षणात राधानगरी, कागल आणि करवीर यांनी चांगले काम केले आहे. इतर तालुक्यांनीही दोन दिवसांत सर्व्हेक्षणाचे काम संपवावे. आकस्मिकतेबाबतचे नियोजन तयार ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.पूरबाधित गावांत माहितीपुस्तिका पोहोच करापूरबाधित गावांमधील नागरिकांच्या स्थलांतरणासाठी माहितीपुस्तिका तयार करून ती गावागावांत पोहोच करा. त्यामध्ये निवारा केंद्राची माहिती, त्यामधील व्यक्तींचे नियोजन, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, नियंत्रण कक्षाचे क्रमांक यांचा समावेश असावा. त्याचबरोबर जनावरांच्या चारा पुरवठ्याबाबत एजन्सी नेमण्याबाबत नियोजन करावे. रेस्क्यू फोर्सना आताच गावे वाटून द्यावीत, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी सतर्क राहावेडेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया हे आजार उद्भवू नयेत यासाठी कोरडा दिवस पाळणे, फवारणी करणे यांबाबत गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्याधिकारी यांनी सतर्क राहावे, असा कोणताही आजार उद्भवल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी बजावले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर