शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रविवार ठरला शालेय साहित्य खरेदीचा वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 14:59 IST

कोल्हापूर : मराठी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळा आज सोमवारपासून सुरू झाल्या. शाळेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी रविवार शेवटचा दिवस असल्याने ...

ठळक मुद्देरविवार ठरला शालेय साहित्य खरेदीचा वारखरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड : दुकाने, मॉल हाऊसफुल्ल

कोल्हापूर : मराठी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळा आज सोमवारपासून सुरू झाल्या. शाळेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी रविवार शेवटचा दिवस असल्याने सुट्टीचे औचित्य साधून पालकांनी पाल्यासह बाजारपेठ गाठल्याने एकच झुंबड उडाल्याचे चित्र होते.कोल्हापूर शहरात रविवार बाजारचा दिवस असल्याने, तर दुकाने शालेय साहित्यांनी भरून गेली होती. इतर लहान-मोठी दुकाने व मॉलही हाऊसफुल्ल झाले होते. यावर्षी साहित्यात किमान १0 टक्के दरवाढ झाली असतानाही बऱ्याच दुकानांमध्ये आॅफर असल्याने गर्दी दिसत होती.जिल्हा परिषद व महापालिका शाळांमधील आठवीपर्यंतच्या मुलांना पाठ्यपुस्तके शाळेतच मिळतात. हा पालकांना मोठा दिलासा आहे; पण त्यांना वह्या, पेनसह इतर स्टेशनरी साहित्य खरेदी करावे लागते. वर्षभर लागणारे साहित्य एकदमच खरेदी करावे लागत असल्याने त्याचे सेट घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. वह्यांमध्येही होलसेल दराने विक्री होणाऱ्या दुकानांमध्ये जास्त गर्दी दिसत होती.

महापालिकेच्या मागील बाजारगेट, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, राजारामपुरीत येथे खरेदीला पसंती दिली जाते. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी (दि. १0) सुरू झाल्याने त्यांची खरेदी बऱ्यापैकी संपली आहे.पुस्तके, वह्या, स्टेशनरी यांच्या जोडीने नवीन दफ्तर दरवर्षी घेतले जाते; त्यासाठी वेगवेगळ्या आकारांतील आकर्षक स्कूल बॅग्ज खरेदी करण्याकडे पालकांचा कल आहे. पावसाळा असल्याने पावसात दफ्तर भिजू नये अशाच स्कूलबॅग्जना जास्त मागणी आहे.

लक्ष्मीपुरी व महाद्वार रोडवर स्कूल बॅग्ज, सॅकमध्ये भरघोस सूट दिल्याचेही बोर्ड झळकत आहेत. याशिवाय रेनकोट आणि छत्र्यांची खरेदीही आताच करून ठेवली जात आहे. यावर्षी सर्वच शालोपयोगी साहित्यांमध्ये दरवाढ दिसत आहे.लक्ष्मीपुरीतील हत्तीमहाल मार्गावर कमी किमतीत वह्या-पुस्तकांसह स्टेशनरी, स्कूलबॅग्ज सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध असतात. रविवारी आठवडा बाजार असल्याने येथे साहित्य खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. येथे नेहमीच कमी दरात साहित्य उपलब्ध होत असल्याने येथे खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असते. हा बाजार गोरगरिबांसाठी मोठा आधारच आहे. आजूबाजूच्या खेड्यांतील लोकही येथे खरेदीसाठी येतात. 

 

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूर