शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मलकापुुरात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा

By admin | Updated: April 18, 2015 00:02 IST

नगरपंचायत : बरखास्त करून प्रशासक नेमावा; अशोकराव थोरात यांची मागणी

मलकापूर : ‘मलकापूर नगरपंचायत स्थापनेपासून केलेल्या प्रत्येक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालात अनेक आक्षेप घेतले आहेत. त्या-त्या काळातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी कोणत्याच आक्षेपाची दुरुस्ती रिपोर्ट आजतागायत दिलेला नाही. त्यामुळे नगरपंचायत कारभारात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नगरपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमावा,’ अशी मागणी अशोकराव थोरात यांनी अन्यायनिवारण समितीच्या वतीने केली. येथील मळाई टॉवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुधाकर शिंदे, अंंकुश जगदाळे, हनिफ मुल्ला, संजय जिरंगे, दादासाहेब येडगे, अमोल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. थोरात म्हणाले, ‘नगरपंचायतीचे लेखापरीक्षण झाल्यानंतर शासकीय लेखा परीक्षकांना त्या-त्या वर्षाचा दुरुस्ती अहवाल देणे बंधनकारक असते. मात्र, गेल्या सहा वर्षांत एकही दुरुस्ती अहवाल त्यांनी सादर केलेला नाही. याशिवाय ग्रामपंचायत काळातीलही दुरुस्ती रिपोर्ट दिलेला नाही. त्यामुळे त्या-त्या काळातील अधिकारी व पदाधिकारी याला जबाबदार आहेत. अनेक वर्षांपासून दुरुस्ती अहवाल देता येत नसेल तर ते सर्व आक्षेपातील भ्रष्टाचारास पात्र आहेत. या नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराची सखोल चौकशी करावी व ती योग्य पद्धतीने होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीवर प्रशासक नेमावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. प्रथम अधिकारी म्हणून पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहे. अधिकाऱ्यांनी दिशा आम्ही ठरवू.’ सन २००१-२००२ ते २००७-२००८ या कालावधीतही ग्रामपंचायतीच्या कारभारात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. त्या काळातीलही दुरुस्त अहवाल सादर केलेला आहे. याशिवाय लेखापरीक्षण अहवालानुसार १५ कर्मचाऱ्यांनी अफरातफर केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात मात्र, चारच कर्मचाऱ्यांवर कारवाई होते. त्यातीलही तीन कर्मचारी सध्या पैसे भरून घेऊन कामावर आहेत. तर बाकीच्यांचे काय? असा सवाल करून अशा अनेक घटना नगरपंचायत कारभारात भ्रष्टाचारास पात्र असल्याचे सिद्ध होत आहे. (प्रतिनिधी) दोषींवर वसुलीची कारवाई करा...नगरपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमावा किमान सहा वर्षांच्या कारभाराची सखोल चौकशी करावी लोखापरीक्षण अहवालानुसार दोषींवर रक्कम वसुलीची कारवाई करावीदोषींवर गुन्हेगारी कट करणे, अपहार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, अशा कृत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत नगरपंचायतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याअंतर्गत कारवाई करावीग्रामपंचायत कालावधीतील चौकशी करून फौजदारी दाखल करावी मलकापुरात दबावतंत्राचाच वापरमलकापूर नगरपंचायत व ग्रामपंचायत कालावधीत मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या जवळचे असणाऱ्यांची १५ वर्षे सत्ता आहे. ग्रामपंचायत काळात तर डॉ. अतुल भोसले व जयंत पाटील यांच्याशीही हात मिळवणी करून मनोहर शिंदे यांनी सत्ता उपभोगली. केंद्रात व राज्यात सत्ताधारी मुख्यमंत्री व मंत्री जवळचे असल्यामुळे आजपर्यंत मलकापुरात दबाव तंत्राचाच अवलंब केला, त्यामुळेच त्यांचे फावले आहे, असा आरोपही अशोकराव थोरात यांनी केला.