दुर्वा दळवी
कोल्हापूर: गुजरातमधील वनतारा येथे नेण्यात आलेल्या नांदणी येथील मठातील माधुरी हत्तीणीबाबत आज उच्चस्तरीय समितीसमोर अत्यंत सकारात्मक सुनावणी पार पडली. मागील निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीकडून डॉक्टर मनोहरण यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरी'च्या आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला. तसेच नांदणी मठाचे माहुत आणि माधुरी हत्तीनीचं नातं विशेष करून अधोरेखित करण्यात आल्याची माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली.हत्तीनीच्या बाबतीमध्ये एकूण समाधानकारक अहवालाच्या आधारे पुन्हा एकदा एक तपासणी करण्याचे ठरलं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेच एचपीसी कडून न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडून नांदणी मठ संस्थान वनतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने जो संयुक्त प्रस्ताव सादर केला गेला. त्या पुनर्वसन केंद्राच्या उभारणीच्या बाबतीमध्ये बांधकाम पूर्वपरवानगी दिल्या गेल्या आणि एकूणच आता इथून पुढं सदर ठिकाणी कामकाजाच्या बाबतीमध्ये गतिमानता निर्माण झाली. आता माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये आजच्या झालेल्या सुनावणीनंतर जागेवरील प्रत्यक्ष कामकाजासाठी आता सकारात्मकता निर्माण झाल्याने त्याबाबतीमध्ये आवश्यकता परवानगी देण्याची कार्यवाही भूमिका एचपीसी कडून घेतली गेली. झालेल्या सुनावणीवर सर्व पक्षकांरानी समाधान व्यक्त केले आणि एचपीसी समोर एकूणच माधुरीबाबत पूर्ण वस्तुस्थिती मांडून पुढच्या प्रक्रियेला एक गतिमांत प्राप्त झाली.
Web Summary : A high-level committee reported satisfactory health of Madhuri, the elephant. A joint proposal for a rehabilitation center received pre-construction approval, expediting progress. All parties expressed satisfaction.
Web Summary : माधुरी हाथी के स्वास्थ्य पर उच्च स्तरीय समिति ने संतोषजनक रिपोर्ट दी। पुनर्वास केंद्र के लिए एक संयुक्त प्रस्ताव को पूर्व-निर्माण मंजूरी मिली, जिससे प्रगति में तेजी आई। सभी पक्षों ने संतोष व्यक्त किया।