शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील, जयंत पाटीलांचे कारस्थान उलथवून लावू - राजू शेट्टी 

By राजाराम लोंढे | Updated: April 15, 2024 16:33 IST

शेट्टी यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत बैलगाडीतून जाऊन  उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला होता, पण इस्लामपूर व कसबा बावड्यातून चावी फिरली आणि उमेदवार दिला. सतेज पाटील यांच्या मायावी बोलणे व जयंत पाटील यांचे कट कारस्थान उलथवून लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

शेट्टी यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत बैलगाडीतून जाऊन  उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार एक झाले आहेत, माझा पराभव झाला तर घरातून बाहेर पडणार नाही. शेतकऱ्यांचे देय १८० कोटी द्यावे लागणार नाही, अशी भूमिका कारखानदारांची आहे. पण, कारखानदार पाताळात गेले तर त्यांनी शोधून काढू, एकालाही सोडणार नाही.

प्रा. जालंदर पाटील म्हणाले, शेतकरी नेत्याला मोडण्यासाठी आघाडी व महायुतीतील शकुनीच्या फौजांनी ताकद लावली आहे. सत्यजीत पाटील दहा वर्षे आमदार होता, ऊस दरावर का नाही बोलला ? जातीचा प्रचार करुन मतविभागणी करण्याचा सुरु असलेला उद्योग हाणून पाडा. सावकार मादनाईक, वैभव कांबळे, सतीश काकडे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक व्ही. एम. सिंग यांनी मनोगत व्यक्त केले.

झुंडीविरोधातील लढाई

खोक्याचा बाजार करणारे झुंडी  माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसे, विचारवंत माझ्यासोबत असल्याने गद्दारांना चितपट करु असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला, ईडीला हिंगलत नाही, मला नोटीस पाठवाच

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीसांकरवी रोखले, दोनशे कार्यकर्त्यांना पोलीसात हजर राहण्याच्या नोटीसा पाठवल्याचा आरोप करत शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी रडीचा डाव बंद करावा, कोंबडं झाकून ठेवले म्हणून उगवायचे थांबत नाही. ईडीला घाबरुन भाजपसोबत येणारा आपण नाही. आपण ईडीला हिंगलत नाही. मला नोटीस पाठवाच, ईडीच्या कार्यालयावरच मोर्चा काढू.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४