सरुड : रॅपिड अँटिजन टेस्टदरम्यान सरुड गावात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. गुरुवारी ३३६ नागरिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली असून, यामध्ये गावातील ४९ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे गावातील कोरोना बाधित रुग्णसंख्या २२८ झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावातील ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ११० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या गावात ११० सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. गेले पाच दिवस गावात सुरू असलेल्या रॅपिड अँटिजन टेस्ट मोहिमेदरम्यान ९० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गावात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली आहे. यापुढे आणखी चार ते पाच दिवस गावात ही तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांनी दिली.
सरुड येथे एकाच दिवशी ४९ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST