साबळेवाडी हे गाव दीड-दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गाव समृद्ध आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एका प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण आल्यानंतर उमेदवार नसल्याने दोन्ही गटाच्या नेत्यांना कुठला उमेदवार उभा करायचा, हा प्रश्न उभा राहिला. यावेळी ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी असणाऱ्या संभाजी आंबी यांना पत्नीची उमेदवारी दाखल करण्यासाठी काही ग्रामस्थांनी प्रोत्साहन दिले. येथे काँग्रेस व शिवसेनेमध्ये आठ जागांसाठी सरळ लढत झाली आणि काँग्रेस सात व शिवसेना दोन असे बलाबल झाले आहे. ज्योती या काँग्रेस पुरस्कृत असल्याने त्यांच्या सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला. ज्योती आंबी यांचे १२ वीपर्यंत शिक्षण झाले असून त्या घरकाम व शेतमजुरीचे काम करून पती संभाजी यांना संसारात हातभार लावतात.
साबळेवाडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची पत्नी सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST