शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 12:08 IST

Zp Kolhapur : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील सरपंच सुवर्णा माने आणि ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांनी पदाचा गैरवापर करून संगनमताने नालेसफाईच्या कामावरील जेसीबी यंत्रणासाठी २५० लिटर डिझेलसाठी २२ हजार ५४२ रुपये दिले आहेत. आर्थिक लाभापोटी त्यांनी हे पैसे दिले आहेत. यामुळे सरपंच माने, अधिकारी कापसे यांच्या प्रशासकीय कामकाजासाठीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन आठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजयसिंह चव्हाण यांना सोमवारी दिले.

ठळक मुद्देसरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करावी उजळाईवाडी ग्रामपंचायत सदस्यांची सीईओंकडे मागणी

कोल्हापूर : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील सरपंच सुवर्णा माने आणि ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांनी पदाचा गैरवापर करून संगनमताने नालेसफाईच्या कामावरील जेसीबी यंत्रणासाठी २५० लिटर डिझेलसाठी २२ हजार ५४२ रुपये दिले आहेत. आर्थिक लाभापोटी त्यांनी हे पैसे दिले आहेत. यामुळे सरपंच माने, अधिकारी कापसे यांच्या प्रशासकीय कामकाजासाठीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन आठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजयसिंह चव्हाण यांना सोमवारी दिले.निवेदनात म्हटले आहे, ग्रामपंचायतीच्या ३० जून २०२१ च्या मासिक बैठकीत जेसीबीसाठी २५० लिटर डिझेलवर २२ हजार ५४२ रुपये खर्च केल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. नालेसफाईच्या कामासाठी जेसीबी यंत्राचा वापर करण्यात आला. या यंत्राला नियमबाह्यपणे २५० लिटर डिझेलचे पैसे दिले. मासिक बैठकीत हा प्रकार सदस्यांना कळाला. यासंबंधी सरपंच माने यांना विचारणा करण्यात आली. पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

मासिक बैठकीत जेसीबी कामाचा आराखडा मंजुरी करून घेतला नाही. करवीर पंचायत समितीकडून प्रशासकीय मान्यताही घेतलेले नाही. ग्रामपंचायतीच्या इतिवृत्तात कोणत्याही जेसीबी यंत्रणाच्या कामाचा ठराव नाही. यामुळे वैयक्तिक लाभापोटी सरपंच माने आणि अधिकारी कापसे यांनी डिझेलसाठी पैसे दिले आहेत. यावर सदस्य प्रकाश मेटेकरी, उत्तम आंबवडे, प्रतिभा पोवार, उज्ज्वला केसरकर, अलका कांबळे, सोनाली मजगे यांनी डिझेलवरील नियमबाह्य खर्चावर आक्षेप घेतला. त्यांनी सीईओ चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आहे.

नालेसफाईचे काम तातडीने करणे गरजेचे असल्याने जेसीबी यंत्राचा वापर केला. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून बिले देण्यास विलंब लागत असल्याने ॲडव्हान्सपोटी जेसीबीच्या डिझेलसाठी पैसे दिले आहेत. या जेसीबीचा वापर सर्वच सदस्यांनी केला आहे. अशी वस्तुस्थिती असताना विरोधक केवळ बदनामी करीत आहेत.सुवर्णा माने, सरपंच

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर