शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगातून गावांच्या समृद्धीसाठी सरपंचांनी पुढे यावे : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 11:55 IST

Satej Gyanadeo Patil, collceator, kolhapurnews मी समृद्ध तर गाव समृद्ध या विचाराने मनरेगा योजना गावपातळीवर राबविण्यात लोकसहभाग वाढवावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

ठळक मुद्देमनरेगातून गावांच्या समृद्धीसाठी सरपंचांनी पुढे यावे : सतेज पाटीलपालकमंत्री पाटील यांनी व्हीसीद्वारे साधला संवाद

कोल्हापूर : मी समृद्ध तर गाव समृद्ध या विचाराने मनरेगा योजना गावपातळीवर राबविण्यात लोकसहभाग वाढवावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना अर्थात मनरेगा या योजनेसंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभा झाली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपायुक्त नयना बोंदार्डे, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, कृषी विभागाच्या उपसंचालक भाग्यश्री पवार हे सहभागी झाले.

रोहयोचे प्रधान सचिव नंदकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, राज्य महिला सरपंच परिषदेच्या अध्यक्षा राणी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक सहभागी झाले.स्वच्छता अभियानासारखे मनरेगातही काम करासरपंचांना मार्गदर्शन करताना आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, ग्रामपंचायती या विकासाची मंदिरे आहेत. सरपंच, ग्रामसेवक हे त्याचे पुजारी आहेत. मनरेगासारख्या योजनेत गावांचा कायापालट करण्याची ताकद आहे. कोल्हापूर हा तर राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे. त्यांच्या विचाराने जिल्हा कायमच नवनवीन संकल्पनांसह अग्रेसर राहिला आहे. ग्रामस्वच्छता अभियानात त्याने हे दाखवून दिले आहे. आता मनरेगामध्येही त्याच उंचीचे काम करायचे आहे.जमीन सुधारणा कार्यक्रम घ्यावनसंवर्धन, मृदा संवर्धन, जलसंवर्धन आणि पशुसंवर्धन कामावर भर द्या, असे सांगताना पोपटराव पवार यांनी कोल्हापूर पाण्याच्या बाबतीत समृद्ध पण अमर्याद वापराने जमिनी खराब होऊ लागल्या आहेत. मनरेगातून जमिनीचा आरोग्य सुधारणा कार्यक्रम घ्यावा, असे सुचविले. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी