शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

सारंग अकोलकरच मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 00:46 IST

‘सीबीआय’ला संशय : अकोलकर, तावडे यांच्या ई-मेलमध्ये सातजणांचा उल्लेख

पुणे/ कोल्हापूर/ मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सारंग अकोलकर आणि त्याच्या एका सहकाऱ्यानेच गोळ्या झाडल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. त्यापार्श्वभूमीवर सीबीआयचे अधिकारी दाभोलकर हत्या प्रकरणाचा सूत्रधार डॉ. वीरेंद्र तावडे याच्याकडून सखोल माहिती घेत आहेत. सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे यांच्यात झालेल्या ई-मेलमध्ये सातजणांचा उल्लेख असून, त्यांचाही शोध घेण्यात येत आहे़ मडगाव बॉम्बस्फोटानंतर अकोलकर हा फरारी असून, त्याचा शोध एनआयएपासून सर्व एजन्सी घेत आहेत़ दरम्यान, तावडे हा सीबीआयला तपासासाठी मदत करीत नसल्याने त्याची न्यायालयाच्या परवानगीने बे्रनमॅपिंग आणि पॉलिग्रॉफ टेस्ट घेण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.ओंकारेश्वर मंदिराजवळ २० आॅगस्ट २०१३ रोजी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी डॉ. दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर जवळपास पावणेतीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने पहिली अटक केली. अकोलकर आणि तावडे यांच्यामध्ये २०० हून अधिक ई-मेलची देवाण-घेवाण झाली होती. यापार्श्वभूमीवर आणि तपास यंत्रणांकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सारंग अकोलकरच असावा, असा दाट संशय सीबीआयला आहे. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार तावडे असल्याचे आतापर्यंतच्या तपासावरून स्पष्ट झाले आहे़ अकोलकरबाबत सीबीआयला माहिती देण्यास तावडे टाळाटाळ करीत आहे. या हत्याकाडांमागे आणखी काही जण असण्याची दाट शक्यता आहे.