शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
7
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
8
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
9
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
10
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
11
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
12
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
13
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
14
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
15
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
16
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
17
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
18
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
19
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
20
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:49 IST

शहराला तळ्याचे स्वरूप : इंदुमती गर्ल्स हायस्कूलची भिंत कोसळली; धरण क्षेत्रात धुवाधार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर संततधार पाऊस राहिला. सकाळी दहा वाजल्यापासून पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने शहराला तळ्याचे स्वरूप आले होते. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली असून, अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले. इंदुमती गर्ल्स हायस्कूलची भिंत कोसळून सुमारे बारा दुचाकी त्याखाली गाडल्या गेल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. पण शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर हळूहळू वाढत गेला. सकाळी दहानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू राहिला. दुपारनंतर पावसाचा जोर कमालीचा वाढला. एकसारखा पाऊस कोसळत राहिल्याने शहरात सगळीकडे पाणीच पाणी झाले. सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले, तर अनेक ठिकाणी काहींच्या घरांत पाणी गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. देवकर पाणंद परिसरातील सुश्रृषानगर, राजलक्ष्मीनगर यासह संभाजीनगर, कळंबा कारागृह व तपोवन परिसरातील काही घरांत रस्त्यावरील पाण्याचे लोट घरात शिरले. गुरुप्रसादनगर, गणेश कॉलनी, आयटीआयच्या पिछाडीस असणाऱ्या चार ते पाच तर सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ, उचगाव येथील सात ते आठ घरांत पाणी शिरले. अचानक पावसाचा जोर वाढल्याने नागरिक (पान ७ वर)शहरात घबराटगेले महिनाभर जिल्ह्यात पाऊस सुरू असला तरी शनिवारी वरुणराजाने रौद्ररूप धारण केले होते. अचानक धुवाधार पाऊस सुरू झाल्याने रस्त्यांचे तळे झाले होते. त्यात शहरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्याने एक प्रकारची घबराट पसरली होती. चोवीस तासांत तालुकानिहाय मिलीमीटरमध्ये असा-करवीर - ५.६३, कागल - ७.२१, पन्हाळा - ५.७१, शाहूवाडी - १७, हातकणंगले - १.६२, शिरोळ - १, राधानगरी - १०, गगनबावडा - १६, भुदरगड - ९, गडहिंग्लज -४.४२, आजरा - ८.७५, चंदगड - १०.३३.