शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:37 IST

सर्वच भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे, यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा संकल्प

वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत सद्गुरु श्री बाळूमामा देवालय ट्रस्टने ''व्हीआयपी'' दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बाळूमामाच्या समाधीचे पावित्र्य जपण्यासाठी गाभारा आणि त्यासमोरील विशेष दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली असून, सर्व भाविकांना समान वागणूक देण्यात येणार आहे.यापुढे सर्व भाविकांना रांगेतून थेट दर्शन, मुखदर्शन आणि पायरी दर्शन या तीन पर्यायांमधूनच दर्शन घ्यावे लागेल. दर्शन मंडपातून सुरू होणाऱ्या रांगेतून भाविकांना बाळूमामांच्या समाधीचे व चांदीच्या पादुकांचे दर्शन घेता येईल. मंदिराच्या पूर्व बाजूने मुखदर्शन व पायरी दर्शनाची सोय केली असून, दोन्ही बाजूंना भंडारा लावण्याची व श्रीफळ, प्रसाद अर्पण करण्याची व्यवस्था आहे.सर्वच भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे, यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा संकल्प असल्याची माहिती देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष शामराव होडगे व सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी दिली.

पुतळे ठेवण्यास बंदीआदमापूर परिसरात काही ठिकाणी दुकानासमोर बाळूमामांचे पुतळे ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे मामांच्या प्रतिमेला बाधा पोहोचू शकते. बाळूमामांच्या प्रतिमेचे पावित्र्य राखले जावे. त्यासाठी असे पुतळे ठेवण्यास देवस्थान समितीने बंदी घालण्याचा निर्णयही घेतला आहे.