शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कर्नाटक एस.टी.ने ओलांडली महाराष्ट्राची हद्द, दोन वर्षांचा वनवास संपला; प्रवाशांतून समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 12:08 IST

गडहिंग्लज व संकेश्वर दोन्ही आगारांच्या बसफेऱ्या नियमितपणे सुरू झाल्यामुळे प्रवाशांतून समाधान

शिवानंद पाटील

गडहिंग्लज: कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या संकेश्वर आगाराच्या ‘संकेश्वर-गडहिंग्लज-संकेश्वर’ बसफेऱ्या रविवार (१३) पासून सुरू झाल्या. हिटणी नाक्यापर्यंत येऊन माघारी फिरणाऱ्या बसेस गडहिंग्लज आगारापर्यंत ये-जा करायला सुरुवात झाली. त्यामुळे सीमाभागातील प्रवासी, रुग्ण, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार मंडळी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणारा गडहिंग्लज-संकेश्वर हा मुख्य राज्यमार्ग आहे. त्यामुळे गडहिंग्लज व संकेश्वर आगाराकडून मोठ्या प्रमाणात बससेवा या मार्गावर सोडल्या जातात. संकेश्वर आगाराने सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग म्हणून या मार्गाला ‘गोल्डन मार्ग’ असे नाव दिले आहे.

गोवा व कोकणात जाण्यासाठीही हा जवळचा मार्ग आहे. या मार्गावर पर्यटकांची वर्दळही माठी आहे. तसेच औरनाळ, दुंडगे, हसूरचंपू, माद्याळ, जरळी, हेब्बाळ, निलजी, मुत्नाळ व हिटणी ही मोठी गावे याच मार्गावर आहेत. त्यामुळे या गावांतील दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एसटीला चांगले उत्पन्न मिळते.

२३ मार्च, २०२० पासून कोरोनामुळे महाराष्ट्र व कर्नाटकची हद्द संपणाऱ्या हिटणी नाक्यापर्यंतच दोन्ही आगाराच्या बसेस धावत होत्या. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसण्याबरोबरच वेळेचा अपव्यय होत होता. गडहिंग्लज व संकेश्वर दोन्ही आगारांच्या बसफेऱ्या नियमितपणे सुरू झाल्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.

निलजीकरांनी वाटले पेढे

गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावरील बसफेऱ्या पूर्ववत सुरू झाल्यामुळे निलजी ग्रामस्थांनी बसचे वाहक, चालक व प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

दररोज लाखाचे उत्पन्न

गडहिंग्लज व संकेश्वर आगाराच्या प्रमुखांनी एकमेकांशी संपर्क साधून या बसफेऱ्या सुरू केल्या. दोन्ही आगारांना या मार्गावर दररोज प्रत्येकी सुमारे ५० हजाराचे उत्पन्न मिळते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक