शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे संजय तेली विशेष कार्य अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी केली नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:48 IST

जमिनीशी संबंधित किचकट प्रकरणे लवकर निकाली निघण्यात मदत होणार

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे जमिनी, महसूलसंबंधी कामांचा निपटारा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची समितीच्या विशेष कार्य अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्याबाबतचा आदेश काढला. यामुळे जमिनीशी संबंधित किचकट प्रकरणे लवकर निकाली निघण्यात मदत होणार आहेत.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील ३ हजार ६४ मंदिरांच्या हजारो एकर जमिनी आहेत. पाच वर्षांपूर्वी समितीने काढलेल्या ढोबळ आकडेवारीनुसार हा आकडा १८ हजार एकर जमिनींचा होता. मात्र, यातील अनेक जागांवर अतिक्रमण, परस्पर खरेदी-विक्री, शर्तभंग झाले आहेत. कसणाऱ्या शेतकऱ्यांकडून खंड भरला जात नाही. बऱ्याच जमिनींची खुद्द देवस्थान समितीकडेही नोंद नाही.जमिनींचे कामकाज तहसीलदार व प्रांत कार्यालयाकडून होते. सध्या जिल्हाधिकारी हे देवस्थान समितीचे प्रशासक असल्याने सगळ्या फायली त्यांच्याकडे सहीसाठी जातात. त्याआधी जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकरण समजून घ्यावे लागते, संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागते. पत्रव्यवहार, फोन करावे लागतात. यामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. देवस्थानकडून येणाऱ्या सगळ्या फायली आधी त्यांच्याकडून तपासल्या जातील. शहानिशा केली जाईल. जमिनी, महसूलसंबंधीच्या कार्यवाही प्रस्तावित केली जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी एकदा तपासून त्या फायलींवर सह्या करतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी