शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळेच कर्नाटकात जाण्याची सुळकूडवर वेळ : संजय पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:39 IST

पायाभूत व प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने सुळकूड (ता. कागल) या गावाने कर्नाटकात जाण्याचा घेतलेला निर्णय हा खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांचे अपयश आहे. त्यांच्या

ठळक मुद्देधनंजय महाडिक, हसन मुश्रीफ यांचे अपयश

कोल्हापूर : पायाभूत व प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने सुळकूड (ता. कागल) या गावाने कर्नाटकात जाण्याचा घेतलेला निर्णय हा खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांचे अपयश आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच गावावर ही वेळ आल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला; तर राज्य शासनाने हे गाव दत्तक घेऊन सर्व योजना येथे राबवाव्यात, अशी मागणी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली.

संजय पवार म्हणाले, या गावाने घेतलेला हा निर्णय धक्कादायक असून, येथील खासदार व आमदारांचे हे अपयश आहे. विकासकामांचे फोटोसेशन करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या या लोकांनी नेमका कोणता विकास केला हा प्रश्न उपस्थित होत आहे. आदर्श ग्राम योजनेतील गावे निवडताना खासदार व आमदारांनी मते किती आहेत याचाच विचार केला आहे. त्यामुळे कर्तृत्व दाखवायचे असेल तर अशी गावे त्यांनी दत्तक घेऊन आपले कर्तृत्व दाखवावे.

विजय देवणे म्हणाले, या गावाला पायाभूत सुविधा मिळत नाहीत म्हणून त्याने कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. संयुक्त महाराष्टÑ चळवळीत अनेक हुतात्मे झाले आहेत. त्यामुळे हा ठराव रद्द करावा यासाठी शिवसेनेने सरपंच लक्ष्मीकांत पाटील यांना विनंतीपत्र दिले आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, संभाजी भोकरे, विद्या गिरी, दिनकर जाधव, दीनानाथ चौगुले, दुर्गेश लिंग्रस, आदी उपस्थित होते.सुळकूडप्रश्नी मंगळवारी बैठकगावाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय बैठक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी राधानगरी-कागल प्रांताधिकाºयांना बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील राधानगरी प्रांताधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती विजय देवणे यांनी दिली.पालकमंत्र्यांनी  सुळकूडला भेट द्यावीपालकमंत्री व सीमाभागाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठी माणसाच्या हितासाठी या गावाला भेट द्यावी व राज्य शासनाने हे गाव दत्तक घेऊन येथील विकासकामांसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी देवणे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण