शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

संजय मंडलिक यांचा लोकसभेसाठी प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:54 AM

कोल्हापूर : आगामी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात मेळावा घेऊन थेट प्रचारच सुरू केला. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला आशीर्वादाचे पाठबळ द्या, असे आवाहन त्यांनी या मेळाव्यात केले.मेळाव्यास शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार प्रकाश आबीटकर, वीरेंद्र ...

कोल्हापूर : आगामी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात मेळावा घेऊन थेट प्रचारच सुरू केला. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला आशीर्वादाचे पाठबळ द्या, असे आवाहन त्यांनी या मेळाव्यात केले.मेळाव्यास शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार प्रकाश आबीटकर, वीरेंद्र मंडलिक यांच्यासह पुण्यातील नोकरदार मंडळी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताकाला जावून मोगा लपविण्याची आपली पद्धत नसल्याचे सांगून मंडलिक यांनी आपण लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे सांगितले. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेले योगदान कोणत्याच पिढीला विसरता येणार नाही. तो विकासाचा वारसा पुढे चालविण्यासाठीच मला संधी द्या, असे आवाहन मंडलिक यांनी केले.आमदार आबिटकर म्हणाले,‘बाळासाहेब यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचे व दिवंगत मंडलिक यांच्यानंतर संजय मंडलिक यांचे काय असे विचारणाऱ्यांना या दोघांनीही स्वकर्तृत्वातून उत्तर दिले आहे.’यावेळी मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पक्षनेते राहुल कलाटे, कामगार सेनेचे जयसिंग पोवार, उद्योगपती लक्ष्मण टिकेकर, शिवाजी शिऊडकर, विश्वनाथ स्वामी, आदी उपस्थित होते.जगदीश परीट यांनी स्वागत केले. पांडुरंग पाटील यांनी प्रास्ताविक केले. नामदेव शिंदे यांनी आभार मानले.महाडिक यांचा खोटेपणादेशभरातील ५४३ खासदारांमध्ये गेल्या चार वर्षांत सर्वाधिक २५५ वेळा संसदीय चर्चेत सहभाग घेतला. ९५३ प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे मीच ‘नंबर वन खासदार’ आहे.इंटरनेटवर ‘डॉट इन लोकसभा’ या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध असून त्यातून खासदार धनंजय महाडिक यांचा खोटेपणा सिद्ध होईल,असा टोला खासदार श्रीरंग बारणे यांनी लगावला.