शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

सानिया, सिद्धराज, तुषार प्रथम, राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 18:00 IST

राम गणेश गडकरी सभागृहात मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धेत सानिया मुंगारे, सिद्धराज पाटील, तुषार शिंदे यांनी आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

ठळक मुद्देसानिया, सिद्धराज, तुषार प्रथमराज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धा

कोल्हापूर : राम गणेश गडकरी सभागृहात मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धेत सानिया मुंगारे, सिद्धराज पाटील, तुषार शिंदे यांनी आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.मंचच्या वतीने सलग सात वर्षे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नऊ ते १४ वर्षे मुले व मुली तसेच १५ ते ३५ व ३६ ते ५० अशा वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण स्पर्धेत कोल्हापूरसह, पुणे, मुंबई, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर, सिंधुदुर्ग व बेळगाव जिल्ह्यातील १३० स्पर्धक सहभागी झाले होते.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष पद्माकर सप्रे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, डॉ. गिरीष वझे, पोर्णिमा वझे, प्रा. एस. के. कुलकर्णी, हेमराज सामाणी, व्ही. बी. पाटील, विजय अग्रवाल, गायिका मंजुषा कुलकर्णी, डॉ. स्वप्निल रानडे, विघ्नेश जोशी, आदी उपस्थित होते.स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा नऊ ते १४ वर्षे : भावगीत : सानिया मुंगारे (चंदगड), तन्वी इनामदार (बेळगाव), रमा शिवदे (सातारा), उत्तेजनार्थ धनश्री शिंदे (पुणे), रिद्धी मारुलकर (सातारा).

नाट्यगीत : सानिया मुंगारे (प्रथम), अन्वी वालावलकर (कोल्हापूर), रमा शिवदे (सातारा), उत्तेजनार्थ : गार्गी अभ्यंकर, श्रीया पाटोळे (कोल्हापूर).

१५ ते ३५ वयोगट :भावगीत : सिद्धराज पाटील, सौरभ पाणदारे (कोल्हापूर), गायत्री कुलकर्णी (सातारा), उत्तेजनार्थ : निखील मधाळे (नेसरी), मधुरा जोशी (कोल्हापूर), तुषार शिंदे.नाट्यगीत : तुषार शिंदे (गडहिंग्लज), ऋतुजा कुलकर्णी (इस्लामपूर), वैष्णवी हजाम (अंध विद्यार्थिनी कोल्हापूर), सानिका फडके (इचलकरंजी), मधुरा जोशी (मुंबई).३६ ते ५० वयोगट :भावगीत : अनघा पुरोहित (कोल्हापूर), डॉ. सुश्रुत हार्डीकर (कोल्हापूर), दीपाली कोल्हटकर (पुणे), उत्तेजनार्थ : लता बडेकर, विप्रा आठले (कोल्हापूर).नाट्यगीत : दीपाली कोल्हटकर (पुणे), अनघा पुरोहित (कोल्हापूर).

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सविता कबनूरकर, मुग्धा देसाई, डॉ. रंजना कुलकर्णी, संगीता काणे, शरद बापट यांनी काम पाहिले. निवेद प्रा. स्नेहा फडणीस उपस्थित होते.

 

 

टॅग्स :musicसंगीतkolhapurकोल्हापूर