हरिपूर : सतरा वर्षांखालील जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कौशल्यपूर्ण लढती पार पडल्या. कुपवाड (ता. मिरज) येथील सूरज स्पोर्टस् अकॅडमीत हे सामने झाले. धुळे येथे होणाऱ्या राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला. स्पर्धेचे उद्घाटन सूरज फौंडेशनचे सचिव एन. जी. कामत व मुख्य कार्यकारी अधिकारी टी. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते झाले. विनायक जोशी व प्रताप पाटील यांनी संयोजन केले. यावेळी हरिभाऊ साळुंखे, शुभम जाधव, संगीता पागनीस, एल. डी. पाटील, अधिकराव पवार, श्रीशैल मोटगी, नीतेश मेस्त्री, अजित पाटील, आदी उपस्थित होते. पंच म्हणून आदित्यराज घोरपडे, सुशांत सूर्यवंशी व मोरेश्वर पाटील यांनी काम पाहिले. निवडण्यात आलेला जिल्हा संघ असा : ईपी : मुले : शिवकांत पाटील, गिरीष जकाते, शोभीत होवाळ, सौरभ यादव. मुली : यशस्वी पवार, नेहा मेस्त्री, अंकिता गायकवाड, प्रार्थना संकपाळ. फॉईल : मुले : गिरीष जकाते, शिवकांत पाटील, शोभीत होवाळ. मुली : यशश्री पवार, प्रार्थना संकपाळ, अंकिता गायकवाड, शिवानी लाड. सेबर : मुले : संवेद मोहिते, शुभम कुलकर्णी, सौरभ यादव, अश्वमेध कनुजे. मुली : नेहा मेस्त्री, रिया जाधव, धनश्री लाड, स्नेहल जाधव. संघ प्रशिक्षक : प्रताप पाटील व संघ व्यवस्थापक : रोहित पोरे. (वार्ताहर)निवड झालेल्या सांगली जिल्हा संघासमवेत विनायक जोशी, प्रताप पाटील, शुभम जाधव, सुशांत सूर्शवंशी व नीतेश मेस्त्री.
राज्य ‘तलवारबाजी’साठी सांगली संघ जाहीर
By admin | Updated: October 21, 2014 23:41 IST