कोल्हापूर : शतकी परंपरा असलेली डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ काॅमर्स (पुणे) ही काॅमर्सविषयी शिक्षण देणारी राज्यातील पहिलीच अग्रगण्य व नामवंत संस्था आहे. या संस्थेमार्फत कोल्हापुरातील स्टार टाॅवर्स, पाच बंगला, शाहूपुरी येथे खास मागणीवरून फक्त रविवारी दुपारी १२ ते ३.३० यादरम्यान टॅक्स कन्सल्टंट कोर्स सुरू होत आहे.
या कोर्समध्ये इन्कम टॅक्स, जी.एस.टी. बिझनेस अकौंटिंग, भागीदारी, ऑडिट प्रोव्हीजन, शेअर्स, इन्शुरन्स, म्युचुअल फंड असा नवीन सुधारित रचना केलेल्या कोर्सचा समावेश आहे. यात कोणत्याही शाखेच्या १२ वी उत्तीर्ण असणाऱ्यांना प्रवेश मिळेल. या स्पेशल कोर्सचा कालावधी सहा महिन्यांचा असून, वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मर्यादित आहेत. नोकरी, प्रमोशन, स्वत:चा व्यवसाय याकरिता हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरला आहे. तरी इच्छुकांनी संस्थेच्या स्टार टाॅवर्स, शाहूपुरी येथील कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी पाच या दरम्यान संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.