शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कडकनाथ घोटाळ्यात संदीप मोहितेसह दोघांना अटक, खोतांकडून राजू शेट्टी लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:53 IST

घोटाळ्यामधील कंपनी संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी मोर्चा काढला होता.

कोल्हापूर/इस्लामपूर (जि. सांगली) : रयत अ‍ॅग्रो इंडिया आणि महारयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपन्यांच्या माध्यमातून कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातून शेतकऱ्यांना मालामाल करण्याचे आमिष दाखवत कोट्यवधींचा गंडा घालणाºया घोटाळ्यातील संशयित संदीप सुभाष मोहिते याला येथील न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, यातील हणमंत शंकर जगदाळे (रा. अंबक चिंचणी, ता. कडेगाव) या संशयितास पोलिसांनी रविवारी अटक केली..

घोटाळ्यामधील कंपनी संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी मोर्चा काढला होता. या वेळी जवळपास २४६ शेतकºयांनी आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारींचे अर्ज पोलिसांकडे दिले होते. पुरावे घेऊन यावे - खोत कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात आपला सहभाग असल्याचे पुरावे माजी खासदार राजू शेट्टींकडे असल्यास त्यांनी ते घेऊन बिंदू चौकात यावे, असे खुले आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. त्याचबरोबर महारयत अ‍ॅग्रो कंपनीत आपले व कुुटुंबीयांचे नाव असल्यास राजकीय संन्यास घेऊन, प्रसंगी भर चौकात फाशीही घेऊ; परंतु खा. शेट्टी यांनी आरोप सिद्ध न केल्यास ते काय प्रायश्चित्त घेणार, हे सांगावे, असा टोलाही खोत यांनी लगावला.राजू शेट्टींना वकिलांमार्फत नोटीस देणारकडकनाथ कोंबडी प्रकल्प फसवणूक प्रकरणात आपली नाहक बदनामी केल्याप्रकरणी दिग्विजय चव्हाण-पाटील व स्वप्निल पाटील यांच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच खासदार राजू शेट्टी यांना वकिलामार्फत बदनामीची नोटीस पाठविणार असल्याचे मंत्री खोत यांनी सांगितले.शेतकºयांचे पैसे मिळवून द्या - शेट्टीकोल्हापूर : सत्तेचा माज आला, की बेताल वक्तव्ये मुखात येतात. त्यांनी अशा प्रकारे आकांडतांडव करण्यापेक्षा गुंतवणूक केलेल्या गरीब शेतकºयांचे पैसे वसूल करून दिले असते, तर अधिक बरे झाले असते, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत kolhapurकोल्हापूर