शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

समीर मुल्लाणी यांच्या सामाजिक बांधीलकीचा गौरव-

By admin | Updated: August 29, 2015 00:02 IST

आदर्श शिक्षक

राजाराम कांबळे- मलकापूर  विद्यामंदिर शित्तूर वारूण येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक समीर मुल्लाणी यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावासमीर मुल्लाणी यांचे प्राथमिक शिक्षण कोरेगाव (ता. वाळवा) येथे झाले. आष्टा येथे रयत शिक्षण संस्थेच्या डी. एड्. कॉलेजमध्ये डी. एड्.पूर्ण करून आदर्श बालकमंदिर शिराळा येथे विनाअनुदानित संस्थेत १९९५ मध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. जिल्हा परिषद कोल्हापूरच्या शिक्षण विभागात १९९५ ला अध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी शाहूवाडीसारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील शिरगाव, ऐतवडी, चनवाड, व शित्तूर-वारूण या प्राथमिक शाळेत सेवा बजावली. तालुक्यात त्यांनी २0 वर्षे सेवा केली. सर्वांत जास्त काळ सेवा त्यांची विद्यामंदिर, चनवाड या शाळेत झाली. या शाळेत त्यांची पत्नी नूरजहाँ मुल्लाणी या देखील सेवेत होत्या. त्यांच्या पत्नी नूरजहाँ मुल्लाणी यांना बी.एड्.च्या राज्य पातळीवरील विद्यापीठ राज्यपाल पुरस्कार व बेस्ट अवॉर्ड मिळाले आहे.चनवाड प्राथमिक शाळेला जयपूर, दिल्ली, उस्मानाबाद, कऱ्हाड, आदी ठिकाणांच्या कमिट्यांनी भेट देऊन शाळेचा गौरव केला. समीर मुल्लाण्णी यांनी आपल्या सेवाकाळात सामाजिक बांधीलकी मानून सेवा बजाविली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांचा आदर्श डोळ््यासमोर ठेवला. माझे आई-वडील, पत्नी नूरजहाँ मुल्लाणी व सहकारी शिक्षकांचे सहकार्य, निष्ठेने, प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळेच पुरस्कार मिळाल्याचे समीर मुल्लाणी सांगतात.पुरस्कार व सन्मानआतापर्यंत त्यांना विविध संस्थांचे दहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २0१४-१५ या वर्षासाठी शाहूवाडी तालुक्यातून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. एकाच वर्षात जिल्हा व राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे ते एकमेव शिक्षक आहेत.शाहूवाडी तालुक्यातील शंकर सणगर यांना १९६७ साली पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. शामराव खडके यांना दुसरा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आठ वर्षांनंतर सर्वांत कमी वयाच्या समीर मुल्लाणी यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे.मुल्लाणी यांनी राबविलेले उपक्रम चनवाड शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग राबविले. एल.सी.डी. प्रोेजेक्टर अध्यापन, औषधी वनस्पती लागवड, गांडूळ खत निर्मिती, सौर अभ्यासिका, आधुनिक साधनाद्वारे ई-लर्निंग, घनकचरा व्यवस्थापन, आॅक्सिजन पार्क, बाल वाचनालय, डिजिटल वर्ग, सुंदर बाग, आदी उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांमुळेच चनवाड शाळेला गुणवत्ता विकास कार्यक्रमात जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला. लोकसहभागातून चार लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव केला. त्यांना ‘स्वच्छ सुंदर हिरवी शाळा’ पुरस्कार मिळाला.