शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

संभाजीराजेंचे चरित्र आता रंगमंचावर

By admin | Updated: May 15, 2015 23:37 IST

कोल्हापूरच्या इतिहासप्रेमींचा उपक्रम : ‘राजा संभाजी’ नाटकासाठी रविवारी आॅडिशन

कोल्हापूर : राजा शंभू छत्रपती म्हणजे मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासातील एक धगधगते पर्व. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकवताना त्यांनी मृत्यूचाही बेदरकारपणे सामना केला. या वीर योद्ध्याचे प्रेरणादायी जीवनचरित्र आता रंगभूमीवर येत आहे. कोल्हापुरातील इतिहासप्रेमींच्यावतीने ‘नरशार्दुल राजा संभाजी’ या ऐतिहासिक नाटकाची निर्मिती करण्यात येत आहे. येत्या तीन महिन्यांत हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘शिवगर्जना’ तसेच ‘गाथा छत्रपतींची’ या महानाट्यांनंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या लेखणीतून संभाजीराजेंचे चरित्र नाट्यरूपात येत आहे. या नाटकाच्या स्क्रीप्टचे संपादन ज्ञानेश महाराव यांनी केले असून दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण करणार आहेत. कोल्हापूरच्या दर्जेदार नाटकांच्या परंपरेचेच पाईक म्हणून ‘राजा संभाजी’ हे नाटक निर्माण केले जाणार आहे. यासाठी ५० हून अधिक कलाकारांची आवश्यकता आहे. रविवारी (दि.१७) सकाळी साडेनऊ वाजल्यापासून शाहू स्मारक भवनात आॅडिशन्स होणार आहेत. इच्छुकांनी बायोडाटा व प्रात्यक्षिकांच्या तयारीसह उपस्थित राहावे. (प्रतिनिधी) आधीच्या नाटकात मृत्यू केंद्रस्थानीछत्रपती संभाजीराजेंचे चरित्र सांगणारी अनेक नाटके यापूर्वी रंगभूमीवर आली आहेत. त्यांची संख्या शिवाजी महाराजांवरील नाटकांपेक्षाही अधिक आहे. राम गणेश गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ हे पहिले नाटक संभाजीराजेंवर लिहिले. त्यानंतर ‘बेबंदशाही’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘शंभूराजे’ अशी अनेक नाटके गाजली. मात्र, यातील काही नाटकांत संभाजीराजेंच्या केवळ मृत्यूवरच प्रकाशझोत टाकण्यात आला आहे किंवा मग संभाजी महाराजांबद्दल गैरसमज पसरावेत, असे वर्णन आहेत.‘राजा संभाजीं’चे वैशिष्ट्य संभाजी महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र मांडणारे हे पहिले नाटक असणार आहे. त्यात संभाजीराजेंच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. संभाजीराजे उत्तम साहित्यिक होते, रसिक होते, मुत्सद्दी लढवय्या होते, त्यांचे राजकारण देशभरात फिरत होते. कुशल राजा म्हणून त्यांनी केलेले कार्य अडीच तासांच्या नाटकात मांडले जाईल. संभाजीराजेंवर आजवर निर्माण झालेल्या बहुतांशी नाटकांत त्यांचे चारित्र्यहनन किंवा मृत्यूचेच अधिक वर्णन आहे. ‘राजा संभाजी’मध्ये मात्र त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतरच्याही काही घटनांचा समावेश असणार आहे.- इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक