शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी ४० वेळा भेट दिल्याचे संभाजीराजे सांगत नाहीत  : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 18:23 IST

Bjp chandrakant patil Kolahpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा भेट दिली नाही, हे सांगितले जाते. परंतु त्यांनी याआधी ४० वेळा भेट दिली ते खासदार संभाजीराजे का सांगत नाही, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देमोदींनी ४० वेळा भेट दिल्याचे संभाजीराजे सांगत नाहीत :चंद्रकांत पाटील भाजपकडून त्यांचा नेहमीच सन्मान

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा भेट दिली नाही, हे सांगितले जाते. परंतु त्यांनी याआधी ४० वेळा भेट दिली ते खासदार संभाजीराजे का सांगत नाही, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांनी संभाजीराजेंविषयी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कशी सकारात्मक भूमिका घेतली हे स्पष्ट केले.पाटील म्हणाले, संभाजीराजे यांना खासदार केल्यानंतर अमित शहा यांनी मला त्यांना घेवून चार्टर्ड फ्लाइटने राष्ट्रीय अधिवेशनासाठी बोलावले. तेथे गेल्यानंतर कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल आपण सर्वजण उठून त्यांचे अभिनंदन करू या असे आवाहन शहा यांनी केले. तेव्हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ नेते, मंत्र्यांनी उठून संभाजीराजे यांचे अभिनंदन केले. हा त्यांचा मोठा सन्मानच केला गेला. हे मात्र संभाजीराजे सांगत नाहीत.कोरोनाची स्थिती असल्याने आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संभाजीराजे ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी यांची भेट मागत आहेत, हा विषय राज्याच्या अखत्यारीतील असल्यामुळे कदाचित ही भेट होत नसावी. मात्र या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादीवाले याच मुद्द्यावरून संभाजीराजेंना प्रोत्साहीत करत असावेत.त्यांच्याविरोधात एकही शब्द बोलणार नाहीमोठे शाहू महाराज, संभाजीराजे किंवा मालोजीराजे समोर आल्यानंतर आमच्या देहबोलीतून आम्ही त्यांच्याविषयीचा आदर व्यक्तच करत असतो. मराठा आरक्षणावरून संभाजीराजे यांनी काही भूमिका घेतली तरी ते शाहू महाराजांचे वंशज असल्यामुळे त्यांच्याविरोधात मी एकही शब्द बोलणार नाही, असेही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर