शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- मंत्री मुश्रीफांच्या पोस्टरवर समरजित घाटगेंचे होर्डिंग, राजकीय वैर कायम; घाटगेंच्या होर्डिंगचीच चर्चा

By समीर देशपांडे | Updated: July 7, 2023 13:32 IST

जिल्हा बँकेच्या अभिनंदन फलकाची चर्चा

कोल्हापूर : राज्याचे नवे कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी कोल्हापूरमध्ये प्रवेश करताना ताराराणी चौकात अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहेत. बरोबर याच फलकाच्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे यांचेही मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील राजकीय वैर पुन्हा यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. समरजित यांनी अपक्ष रिंगणात उतरून २०१९ साली मुश्रीफ यांच्या नाकात दम आणला होता. यानंतर त्यांनी पायाला भिंगरी लावून मुश्रीफांविरोधात वातावरण निर्माण करण्याचा सपाटा लावला होता. अशातच अजित पवार युतीसोबत येवून मुश्रीफ कॅबिनेट मंत्री झाल्याने घाटगे यांना मोठा धक्का बसला. परंतू समरजित यांनी गुरूवारी कागलमध्ये मेळावा घेत येणाऱ्या विधानसभेला मोठ्या फरकाने निवडून येवून आमदार होणार असल्याचे जाहीर करून कार्यकर्त्यांना पुन्हा बळ दिले. याही पुढे जात आता मुश्रीफ यांच्या अभिनंदनाच्या फलकावर घाटगे यांचा फलक आणि त्यावर लिहलेला ‘निष्ठा’ हा शब्द मुश्रीफ यांची कळ काढणारा आहे. या फलकांची चर्चा आता जिल्हाभर सुरू झाली आहे.जिल्हा बँकेच्या अभिनंदन फलकाची चर्चायाच ठिकाणी जिल्हा बँकेच्या संचालकांच्यावतीने मुश्रीफ यांचे अभिनंदन करणारा मोठा फलक लावण्यात आला आहे. परंतु त्यात काँग्रेस संचालकांची नावे दिसत नाहीत. तसेच मुश्रीफांच्या आघाडी विरोधात निवडून आलेले बाबासाहेब पाटील असूर्लेकर यांचाही फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. मानसिंग गायकवाड यांचा कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय झाला नसला तरी त्यांच्या मुलाचा फोटो मुश्रीफ यांच्या अभिनंदन फलकावर आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेPoliticsराजकारण