शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सम्मेद शेट, अनिश गांधी यांनी एकाच वेळी दिली अनेकांशी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:09 IST

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनीश गांधी या दोघांनी रविवारी एकाच वेळी ३२ बुद्धिबळपटूंशी प्रदर्शनीय सामना शिवाजी स्टेडियम येथे खेळला. यात सम्मेदने ३२, तर अनीशने ३० जणांशी एकाच वेळी लढत दिली. या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे करण्यात आले होते.

ठळक मुद्देसम्मेद शेट, अनिश गांधी यांनी एकाच वेळी दिली अनेकांशी लढतकोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा उपक्रम; ३२ जणांशी खेळला सामना

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनीश गांधी या दोघांनी रविवारी एकाच वेळी ३२ बुद्धिबळपटूंशी प्रदर्शनीय सामना शिवाजी स्टेडियम येथे खेळला. यात सम्मेदने ३२, तर अनीशने ३० जणांशी एकाच वेळी लढत दिली. या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे करण्यात आले होते.सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या पहिल्या सत्रात अनीश गांधी याने ३0 बुद्धिबळपटूंशी स्वतंत्र पटावर लढत दिली. या ३0 पैकी पाच बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त होते. पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळणाºया अनीशने सुरुवातीस सावध व आक्रमक चाली रचत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकला. तोडीस तोड खेळ करीत सर्व प्रतिस्पर्ध्यांनी अनीशची दमछाक करण्याचा प्रयत्न केला; परंतु डावाच्या मध्यपर्वात अनीशने कल्पक चाली रचत प्रतिस्पर्ध्यांना गोंधळात टाकले.

हळूहळू एकेकाचे डावावरील नियंत्रण सुटू लागले. त्याचा अचूक फायदा उठवीत त्याने एकेकावर मात करण्यास सुरुवात केली. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वच्या सर्व ३0 प्रतिस्पर्ध्यांना साडेतीन तासांत अनीशने पराभूत केले. जयदीप कोळीने अनीशला चांगलेच झुंजविले.दोन वाजता सुरू झालेल्या दुसऱ्या सत्रामध्ये सम्मेद शेटेविरुद्ध ३२ प्रतिस्पर्ध्यांनी भाग घेतला होता, यापैकी १४ बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त होते. पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळणाऱ्या सम्मेदने सुरुवातीपासून आक्रमक व जलद चाली रचत प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच जखडून ठेवण्यात यश मिळविले.नंतर सम्मेदने पटावर गुंता करून प्रतिस्पर्ध्यांना बुचकळ्यात पाडून एकेकावर मात करण्यास सुरूकेले. तीन तासांमध्ये २४ प्रतिस्पर्ध्यांवर त्याने मात केली. शेवटी उरलेल्या आठ प्रतिस्पर्ध्यांना अतिजलद पद्धतीने खेळविण्यात आले.

दीर्घकाळ लढत दिलेल्यांमध्ये तुषार शर्मा, आदित्य सावळकर, शर्विल पाटील, अथर्व चव्हाण, प्रणव पाटील यांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत सम्मेदला झुंज दिली; परंतु अनुभवी सम्मेदने सर्वांवर मात केली. या उपक्रमासाठी भरत चौगुले, उत्कर्ष लोमटे, मनीष मारुलकर, प्रीतम घोडके, तुषार शर्मा यांनी परिश्रम घेतले.

 

 

टॅग्स :Chessबुद्धीबळkolhapurकोल्हापूर