शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचा विक्री दर ३१०० रुपये होणार; आठवड्यात निर्णय; केंद्राच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:45 IST

साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपये प्रतिक्विंटलवरून ३१०० रुपये करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत

ठळक मुद्देयावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मंगळवारी विश्वसनीय सूत्रांनी दिली.साखरेचा किमान विक्रीदर ३५०० रुपये प्रतिक्विंटल करावा, अशी मागणी साखर कारखानदारांची आहे.

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपये प्रतिक्विंटलवरून ३१०० रुपये करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. येत्या आठवड्यातच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मंगळवारी विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अतिरिक्त उत्पादन आणि त्यामुळे घसरलेल्या साखरेच्या दरामुळे साखर कारखाने अडचणीत आल्याने गेल्यावर्षी जून महिन्यात साखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपये प्रतिक्विंटल असा केंद्र सरकारने निश्चित केला. यासह विविध उपाययोजनाही केल्या तरीही गेल्या हंगामात १०३ लाख टन साखर शिल्लक राहिली. त्यात चालू हंगामातही ३०७ लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे. साखरेचा प्रतिक्विंटल उत्पादनखर्च ३४०० रुपये आहे. तो साखर विक्रीतून भरून निघत नाही. उसाची एफआरपी देणेही शक्य होत नाही. त्यामुळे साखरेचा किमान विक्रीदर ३५०० रुपये प्रतिक्विंटल करावा, अशी मागणी साखर कारखानदारांची आहे.

चालू हंगामातील देशातील साखर कारखान्यांकडे सध्या उसाची २० हजार कोटींची एफआरपी थकीत आहे. साखरेचे दर न वाढल्यास ती देताच येणार नाही, अशी भूमिका कारखान्यांनी घेतली आहे. त्यातच लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पाच राज्यांतील पराभवानंतर केंद्र सरकार कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्याचे प्रत्यंतर केंद्राच्या अंतरिम अर्थसंकल्पात आले आहे. ऊस उत्पादक आणि साखर उद्योगासाठी या अर्थसंकल्पात काहीच नव्हते. यामुळे या उद्योगाने नाराजी व्यक्त केली होती. ती दूर करून हा उद्योग अडचणींतून बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान विक्रीदर ३१०० रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जवळजवळ घेतला आहे. त्याची घोषणा आठवड्याभरात होणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, साखर उद्योगाला अडचणींतून बाहेर काढण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निती आयोगाने एका कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना केल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली आहे.दर वाढल्यास काय होईल?साखरेचा किमान विक्री दर वाढल्यास साखर कारखान्यांना बॅँकाकडून मिळणाऱ्या अ‍ॅडव्हान्स रकमेतही वाढ होऊन एफआरपी देण्यासाठी त्यांना मदत होईल.साखर निर्यातीचा कोटा ठरवून देऊन केंद्र सरकारने कारखान्यांना साखर निर्यात सक्तीची केली आहे. सध्याच्या आंतरराष्टÑीय बाजारातील दरानुसार कारखान्यांना देशांतर्गत दरापेक्षा सुमारे २०० रुपये कमी मिळतात.

हा तोटा ४०० रुपयांवर जाईल. मात्र, निर्यात केल्याशिवाय अतिरिक्त साखरेचा प्रश्न सुटणार नाही हे कारखान्यांनी लक्षात घ्यायला हवे. दर वाढल्यास खुल्या बाजारातील साखरेचे दर त्या प्रमाणात वाढतील. साहजिकच त्याचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर पडेल.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी