शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांची राजरोस विक्री, कोल्हापुरात उघडकीस आला प्रकार

By उद्धव गोडसे | Updated: March 9, 2023 19:32 IST

गोळ्या खाल्ल्यानंतर महिलेला रक्तस्रावाचा त्रास

कोल्हापूर : स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री बंद असली तरी, गोकुळ शिरगाव येथील एका मेडिकलमधून अशा गोळ्यांची विक्री झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गोळ्या खाल्ल्यानंतर रक्तस्रावाचा त्रास होणारी महिला उपचारासाठी सीपीआरमध्ये आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणारे रॅकेट पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आता गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारे रॅकेटही सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये एका कारखान्यात काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे. दोन मुले असल्याने तिसरे मूल नको, असा विचार करीत त्यांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गोकुळ शिरगावमधील एका लॅबमध्ये सोनोग्राफी केली. त्यानंतर एका मेडिकलमधून त्यांनी गर्भपाताच्या पाच गोळ्या घेतल्या. गोळ्या खाल्ल्यानंतर महिलेला रक्तस्रावाचा त्रास सुरू झाला. गेली दहा ते बारा दिवस रक्तस्रावाचा त्रास सुरू असल्याने ती गुरुवारी उपचारासाठी सीपीआरमध्ये आली.डॉक्टरांनी केलेल्या चौकशीनंतर तिने गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सीपीआर पोलिस चौकीतील पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून याची माहिती गोकुळ शिरगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार गोकुळ शिरगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPregnancyप्रेग्नंसीmedicineऔषधंCrime Newsगुन्हेगारी