शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी औषधांची विक्री प्रकरण :‘जीवनधारा’ला औषध पुरविणाऱ्या मुख्य वितरकावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 16:43 IST

कोल्हापूर : सरकारने पुरविलेल्या औषधांची ‘सीपीआर’मधील औषध दुकानांतून विक्री झालेल्या प्रकरणातून रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. ‘नॉट फॉर सेल’ची ...

ठळक मुद्देसरकारी औषधांची विक्री प्रकरण :‘जीवनधारा’ला औषध पुरविणाऱ्या मुख्य वितरकावर छापा‘ओम सर्जिकल्स’च्या औषधसाठ्याची दिवसभर तपासणी; रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

कोल्हापूर : सरकारने पुरविलेल्या औषधांची ‘सीपीआर’मधील औषध दुकानांतून विक्री झालेल्या प्रकरणातून रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. ‘नॉट फॉर सेल’ची औषधे विक्री करणाऱ्या जीवनधारा मेडिकल स्टोअर्सला औषध पुरवठा करणाऱ्या ओम सर्जिकल्स या मुख्य वितरकावर  अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून त्याच्याकडील औषधसाठ्याची दिवसभर तपासणी केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी सहभागी असणाऱ्यांची धावाधाव सुरू असून, सहभागी रॅकेटचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.सरकारने शासकीय रुग्णालयांसाठी पुरविलेली व बाहेर विक्रीसाठी परवानगी नसलेली (नॉट फॉर सेल) औषधे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारातील जीवनधारा औषध दुकानातून ‘सीपीआर’मधील रुग्णांना विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १५) उघडकीस आला.महिलेच्या प्रसूती शस्त्रक्रियेवेळी वापरण्यात येणारे ‘कॅटगर्ट’ हे औषधी किट सोमवारी (दि. १५) जीवनधारा मेडिकल स्टोअर्समधून सीपीआर रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांना विकण्यात आले; पण हे ‘कॅटगर्ट’ किट सरकारने पुरविलेले व त्यावर ‘नॉट फॉर सेल’असा स्पष्ट उल्लेख असतानाही ते खासगी मेडिकल स्टोअर्समधून विकले कसे गेले? सरकारने पुरविलेली औषधे बाहेर खासगी मेडिकलमार्फत विक्री करणारे रॅकेट कार्यरत असल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे.जीवनधारा मेडिकल स्टोअर्समधील औषधसाठ्याची अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी (दि. १६) दिवसभर तपासणी केली. ‘जीवनधारा’ला औषध पुरवठा करणाऱ्या येथील महाराणा प्रताप चौकानजीकच्या ओम सर्जिकल्स या मुख्य वितरकावरही  अन्न औषध प्रशासनाने छापा टाकून त्यांच्याही औषधसाठ्यांची तपासणी सुरू केली. सायंकाळी उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती.गोपनीय पथक कार्यरतसरकारने पुरविलेली औषधे खासगी औषध दुकानांतून विकली कशी जातात? ती औषधे तेथे कशी पोहोचली? त्यामध्ये कोण-कोण सामील आहेत? याबाबत रॅकेट कार्यरत असल्याच्या संशयात भर पडल्याने या प्रकरणाची चौकशी करून त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे आदेश राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार ‘सीपीआर’मधील अधिकाºयांचे पथक कार्यरत केले असून, ते गोपनीय पद्धतीने माहिती गोळा करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.‘जीवनधारा’च्या छाप्यात आढळले किटजीवनधारा मेडिकल स्टोअर्समध्ये मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या औषधसाठ्याच्या तपासणीमध्ये ‘कॅटगर्ट’ हे औषधी किट मिळून आले असून, त्यावर ‘गव्हर्न्मेंट सप्लाय, नॉट फॉर सेल’ असा शासनाचा शिक्का मिळाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.अधिकाऱ्यांवर दबावजीवनधारा या मेडिकल स्टोअर्सला औषध पुरवठा करणाऱ्या ओम सर्जिकल या मुख्य वितरकावर छापा टाकून त्याच्या औषधसाठ्याची तपासणी सुरू असताना एका सामाजिक कार्यकर्त्याने अन्न व औषध प्रशासनाच्या तपासी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ही माहिती फोनवरून मुख्य कार्यालयास कळविल्यानंतर कार्यालयातील काही कर्मचारी तेथे गेले असता त्या सामाजिक कार्यकर्त्याने पलायन केले.

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर