मंगळवारपासून राज्यभरातील दस्त नोंंदणी मुद्रांक विक्री होणार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:24 AM2021-09-18T04:24:40+5:302021-09-18T04:24:40+5:30

कोल्हापूर : सातत्याने मागणी करूनदेखील मागील चार वर्षांपासून राज्य सरकारकडून लक्ष दिले जात नसल्याने वैतागलेल्या मुद्रांक विक्री व ...

The sale of diarrhea registration stamps across the state will come to a standstill from Tuesday | मंगळवारपासून राज्यभरातील दस्त नोंंदणी मुद्रांक विक्री होणार ठप्प

मंगळवारपासून राज्यभरातील दस्त नोंंदणी मुद्रांक विक्री होणार ठप्प

Next

कोल्हापूर : सातत्याने मागणी करूनदेखील मागील चार वर्षांपासून राज्य सरकारकडून लक्ष दिले जात नसल्याने वैतागलेल्या मुद्रांक विक्री व दस्त नोंदणी विभागातील अराजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे आंदोलनास्त्र बाहेर काढले आहे. मंगळवार (दि. २१) पासून सुरू होणाऱ्या संपामुळे राज्यभरातील दस्त नोंदणीची व मुद्रांक विक्रीची कामे पूर्णपणे ठप्प होणार आहेत.

आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने वर्षभर थांबलेले चक्र वेगाने रुळाने येऊ लागले आहेत. मुद्रांक व दस्त नोंदणीसाठीही गर्दी वाढली होती; पण आता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतल्याने जनता, पक्षकार यांची अडचण होणार आहे. राजपत्र अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

संघटनेचे मागण्या अशा आहेत, सर्व संवर्गातील पाच-सहा वर्षांपासून रखडलेल्या पदाेन्नत्या द्या, पदाेन्नती झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लावू नयेत, विभागातील रिक्त पदे भरावीत, कोविडने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांच्या विम्यासह अनुकंपा तत्त्वावर भरती करावी, मुंबईतील मुद्रांक जिल्हाधिकारी पद विभागातील पदोन्नतीने भरणे, तुकडेबंदी व रेरांतर्गत झालेल्या कारवाया मागे घ्या, नोंदणी अधिकाऱ्यांवर दाखल होणारे गुन्हे मागे घ्या, विभागीय पदोन्नतीमध्ये संघटनेला प्रतिनिधित्व द्या, विभागीय चौकशीची कारवाई वेळेत करणे अशा २१ प्रकारच्या मागण्याच्या पूर्ततेसाठी हा संप होत आहे.

Web Title: The sale of diarrhea registration stamps across the state will come to a standstill from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.