शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result: वडिलांचे छत्र हरवलं, अनेक अडचणींचा सामना करत 'साक्षी'ने धवल यश मिळवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 12:47 IST

साक्षीने वडिलांचे हरवलेले छत्र, दुर्गम आणि डोंगराळ भागात राहून देखील अनेक अडचणींचा सामना करत स्वतःच्या ध्येयाला कर्तृत्वाची जोड देऊन दहावीच्या परीक्षेत ९६.४० % गुण मिळवून केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला.

गारगोटी : कडगाव ता.भुदरगड येथील साक्षी महादेव कांबळे हिने वडिलांचे हरवलेले छत्र, दुर्गम आणि डोंगराळ भागात राहून देखील अनेक अडचणींचा सामना करत स्वतःच्या ध्येयाला कर्तृत्वाची जोड देऊन दहावीच्या परीक्षेत ९६.४०% गुण मिळवून केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला. कडगाव सारख्या दुर्गम भागात कोणत्याही सोयी सुविधा नसताना आणि घरी अठरा विश्व दारिद्य्र असतानादेखील तिने मिळवलेल्या विजयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.साक्षी कांबळे ही कडगाव येथील कुमार भवन या प्रशालेत शिक्षण घेत आहे. ती पाचवीत असताना वडील महादेव कांबळे यांचे निधन झाले. वडिलांच्या जाण्याने तिची आई निता कांबळे यांच्यावर आकाश कोसळले. तुटपुंजी जमीन, उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही पदरात दोन मुली! भविष्यात अंधार दिसू लागला. पण दीर आणि भाऊ पाठीशी ठाम उभे राहिले. दोन मुलींना आपले सर्वस्व मानले आणि प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्या सज्ज झाल्या. त्यानंतर त्यांना आशा स्वयंसेविका म्हणून नोकरी मिळाली. या तुटपुंज्या मानधनावर त्यांनी संसाराचा रथ ओढायला सुरुवात केली. मुलींनी देखील आपल्या परिस्थितीची कल्पना असल्याने जोमाने अभ्यास सुरू केला.साक्षीने आईच्या कष्टाचे चीज करायचे ही जिद्द मनी बाळगून चांगला अभ्यास करुन दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला. तिला इंजिनियरिंग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवायचा मानस आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल