शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

HSC Result 2022: साक्षीने वाजवली केएमटी कंडक्टर आईच्या 'स्वप्नांची बेल'; माय लेकींचा असाही योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 15:09 IST

आई पहाटे ड्यूटीवर जायची, संध्याकाळी घरी यायची, पण, तोपर्यंत घरची कामे सांभाळून अभ्यास करायची.

नसिम सनदीकोल्हापूर : कसबा बावड्यातील साक्षी कोळीने महावीर महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून ६८ टक्के गुण मिळवत केएमटी कंडक्टर असलेल्या आईच्या स्वप्नांची बेल वाजवली. आईच्या २० वर्षाच्या कष्टाचे साक्षीने चीज तर केलेच, शिवाय आता पोलीस खात्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढची वाटचाल सुरू होणार आहे. यानिमित्ताने लेकीच्या शिक्षणासाठी आईने केलेल्या कष्टाला फळ आले आहे.कसबा बावड्यातील रेखा संदीप कोळी या केएमटीमध्ये कंत्राटी पद्धतीवर कंडक्टर म्हणून गेल्या पाच वर्षापासून काम करतात. रोजंदारीवर असल्याने ड्यूटी लागली तरच पगार मिळतो. पगार जरी १२ हजार असला तर हातात सात हजारच पडतात. एवढ्यात घरखर्च भागविणे कसरतीचेच. संसारात आर्थिक चणचणीमुळे कसरत करावी लागत असली तरी पोरांच्या शिक्षणाची मात्र त्यांनी आबाळ होऊ दिलेली नाही. मुलगा दहावीत तर मुलगी बारावीत. नोकरीच्या वेळा सांभाळून, प्रसंगी पोटाला चिमटा देऊन या आईने पोरांना शिक्षण दिले. चांगले शिक्षण मिळावे म्हणून फी भरून चांगल्या शाळेत प्रवेश मिळविले. कंडक्टर म्हणून नोकरी लागायच्या आधी धुणीभांडी व जेवणाची कामे करून मुलांना लहानाचे मोठे केले.

हे करताना स्वत:च्या स्वप्नांना मूठमाती दिली. पोलीस व्हायचे होते. पण, घरच्या विरोधामुळे होता आले नाही. आता साक्षीला पोलीस करण्यासाठी येथून पुढे संघर्ष असणार आहे. आईचा हा संघर्ष लहानपणापासून पाहिलेल्या साक्षीनेही महावीर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत मन लावून अभ्यास केला. आई पहाटे ड्यूटीवर जायची, संध्याकाळी घरी यायची, पण, तोपर्यंत घरची कामे सांभाळून अभ्यास करायची.असाही योगायोगदहावी झाल्यानंतर लग्न झाले, त्यानंतर १४ वर्षांनी रेखा कोळी यांनी बारावीची परीक्षा दिली. ६८ टक्के गुणांनी त्या उत्तीर्ण झाल्या. आता साक्षीलाही ६८ टक्केच गुण मिळाले आहे. माय लेकींचा असा गुणांचाही योगायोग जुळून आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकाल