शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

संत बहिणाबाई या कोल्हापूरमध्येच घडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:30 IST

कोल्हापूर : संत तुकाराम यांचे अभंग कोल्हापूरमध्ये त्या काळी बहिणाबार्इंच्या कानी आले नसते, तर पुढे त्यांच्याबाबतचा इतिहास होऊ शकला ...

कोल्हापूर : संत तुकाराम यांचे अभंग कोल्हापूरमध्ये त्या काळी बहिणाबार्इंच्या कानी आले नसते, तर पुढे त्यांच्याबाबतचा इतिहास होऊ शकला नसता. त्यामुळे तुकारामांच्या एक महत्त्वाच्या शिष्या कोल्हापूरमध्ये घडल्या, हे लक्षात घ्यावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनातर्फे आयोजित ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ या द्विखंडात्मक ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, साहित्यिक प्रा. राजन गवस, गाथेचे ‘निरूपण’कार मारुती जाधव प्रमुख उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, बहिणाबाई यांच्या कुटुंबीयांनी काही कारणाने सिऊर (औरंगाबाद) येथील त्यांचे घर सोडले. फिरत-फिरत ते कोल्हापूरमध्ये आले. काही वर्षे ते येथे होते. त्यावेळी येथे साताऱ्याच्या जयरामस्वामी वडगावकर यांची कीर्तने सुरू होती. ते आपल्या कीर्तनांत तुकारामांचे अभंग सादर करीत. बहिणाबार्इंना जणू त्या अभंगांचे वेड लागले. त्यांनी तुकारामांना गुरू करायचे ठरविले. त्यांच्या दर्शनासाठी त्या देहूला पोहोचल्या. तेथे त्यांना तुकारामांचा गुरूपदेश, सहवास लाभला. त्यापुढे संत बहिणाबाई झाल्या. त्यामुळे तुकारामांच्या एक महत्त्वाच्या शिष्या कोल्हापूरमध्ये घडल्या.डॉ. शिंदे म्हणाले, संत तुकाराम यांनी जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाची शिदोरी आपल्या अभंगांमधून खुली केली. हे ज्ञान माणसाचे जगणे सहजसोपे आणि नितांतसुंदर बनविणारे आहे.मारुती जाधव म्हणाले, एखाद्या संताच्या अभंगांचा ग्रंथ प्रकाशित करणारे शिवाजी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ही गाथा प्रकाशित करून विद्यापीठाने माझा व्यक्तिगत सन्मान तर वाढविलाच; पण वारकरी समाजासाठीही भरीव योगदान दिले आहे.या कार्यक्रमात अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले. मराठी अधिविभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले.मराठी भाषेलाशब्दांची देणगीसंत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेला कितीतरी नवनवीन शब्दांची देणगी दिली. ही भाषा समृद्ध करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे अभंग आशयात्मकदृष्ट्या गहन आहेत. मारुती जाधव (तळाशीकर) गुरुजी यांनी आशयसूत्रे लक्षात घेऊन या अभंगांचे अत्यंत चिकित्सकपणे, सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून वर्गीकरण केले. हे ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.