शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आदमापुरात संत बाळूमामांचा जन्मकाळ सोहळा उत्साहात; आकर्षक पुजा, फुलांची सजावट अन् भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 18:59 IST

दत्ता लोकरे सरवडे : कर्नाटक, आंध्र, गोवा, कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड ) संत बाळुमामांचा जन्मकाळ सोहळा विविध ...

दत्ता लोकरे

सरवडे : कर्नाटक, आंध्र, गोवा, कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड ) संत बाळुमामांचा जन्मकाळ सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी देवालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने आदमापूर पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बाळुमामा मंदिरामध्ये गाभाऱ्यात विविध फुलांची सजावट करण्यात आली होती. बाळूमामांचा पाळणा झेंडूच्या फुलांनी व जरबेरा फुलांनी आकर्षकपणे सजवला होता. तर बाळुमामांची आकर्षक पुजा बांधण्यात आली होती. संपूर्ण मंदिर व कळस लाईटींगने झळाळून गेला होता. जन्मसोहळयानिमित्त बाळासो पाटील, नानासो द पाटील आदी़ंची प्रवचन व कीर्तन सेवा झाली.सकाळी काकड आरती, अभिषेक, समाधीचे पुजन, आदी धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर  दुपारी ४ वा.२३ मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ सोहळा संप्पन्न झाला. यावेळी भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. भाविकांनी बाळूमामांचे पाळण्याचे दर्शन घेण्यासाठी आणि फूले वाहण्यासाठी गर्दी केली.मरगुबाई  मंदिरामधूनजन्म समाधीस्थळी अश्वासह  भंडारा आणून श्रींचा पालखी सोहळा झाला. मंदिरानजीक आल्यावर श्रींच्या पाळण्याचे पुजन मानकरी राजनंदिनी भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. या जन्मसोहळ्या प्रसंगी सुहासीनी श्रींचा  पाळणा ओवाळून पाळणा गीते गायली. तसेच ढोल कैताळांच्या निनादामध्ये भंडा-याची मुक्तहस्ते उधळण झाली. मंदिरासभोवती श्रींचा पालखीसोहळा झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्यावतीने महाप्रसाद झाला. महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. यावेळी धर्मादाय सह. आयुक्त एस. एस. वाळके, प्रशासकीय अध्यक्ष शिवराज नाईकवाडे, रागिणी खडके, भाविक व ग्रामस्थ, कर्मचारी, अधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं